Tarun Bharat

कोल्हापुरात कोरोनाग्रस्तांची संख्या 218 वर; शाहूवाडीत सर्वाधिक 69

प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभरात 1448 प्राप्त अहवालापैकी 36 अहवाल पॉझीटिव्ह तर 1411 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 नाकारण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 218 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 69 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज दिवसभरात आलेल्या 36 पॉझीटिव्ह अहवालामध्ये आजरा-1, भुदगरड-4, चंदगड-7, गगनबावडा-2, राधानगरी-1, शाहूवाडी-15 आणि महानगरपालिका क्षेत्रात-6 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 11, भुदरगड- 22, चंदगड- 13, गडहिंग्लज- ५, गगनबावडा- 4, हातकणंगले- 1, कागल- 1, करवीर- 10, पन्हाळा- 13, राधानगरी- 35, शाहूवाडी- 69, शिरोळ- 4, नगरपरिषद क्षेत्र- 7, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-19 असे एकूण 214 आणि पुणे-1, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 218 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

Related Stories

राऊतांचा दसरा कोठडीतच; मुक्काम 10 ऑक्टोबरपर्यंत वाढला

datta jadhav

कोल्हापूर : खत दरवाढीविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने

Archana Banage

मुंबई लोकलवर पुन्हा एकदा निर्बंधाची शक्यता : विजय वडेट्टीवारांचे संकेत

Tousif Mujawar

शियेत राज्य मार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण, शेतकरी संघटनेकडून निषेध

Archana Banage

उत्तराखंड : लक्ष्मणझूला – सिलोगी मार्गावर कार दरीत कोसळली; तीन जण ठार

Tousif Mujawar

कोल्हापुरात फुटबॉल खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी सुरू

Abhijeet Khandekar