Tarun Bharat

कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरूच; आज २३ नवे रुग्ण

ऑनलाईन टीम

कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज सायंकाळी जिल्ह्यात २३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये चंदगड तालुक्यातील दहा, हातकणंगले – चार, आजरा – तीन, करवीर व गडहिंग्लज प्रत्येकी दोन, शिरोळ व कोल्हापूर शहरात प्रत्येकी एका कोरोना रुग्णाची भर पडली आहे. तर आज इचलकरंजीतील महिलेचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील कोरोना बळींचा आकडा १४ वर गेला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

जिल्‍ह्यात आता एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 927 झाली आहे. आज दिवसभरात तीन व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 732 झाली आहे. तर 160 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारी मध्‍यरात्री आलेल्या अहवालामध्ये कोल्हापूर शहरातील सातजणांचा समावेश आहे. शहरातील न्यू शाहूपुरी, राजारामपुरी, राज्यपाध्ये नगर परिसरात हे रुग्ण आढळले आहेत.

तेवीस पॉझिटिव्ह रुग्ण गावनिहाय

हातकणंगले तालुक्यातील इचलकंजी येथील गुरुकांनाननगर जुना चंदुर रोड दोन महिला अवधूत 11 परिसरातील, करवीर तालुक्यातील कणेरी आणि गोकुळ शिरगाव येथील पुरुष. चंदगड तालुक्यातील साकुर येथील मुलगा ढोलगरवाडी येथील पुरुष, अडकूर येथील अन्य पाच जण. मोगली येथील तीन महिला, कोल्हापूर शहरातील जुना बुधवार पेठेतील दोन वर्षांची बालिका, गडहिंग्लज तालुक्यातील कौलगेचा पुरुष, महागावची महिला. आजरा तालुक्यातील भादवन आरोळ येथील तीन महिला. जयसिंगपूर कडगे भागातील पुरुष यांचा समावेश आहे.

Related Stories

विधानपरिषद निवडणुकीची रणनीती ठरली- उपमुख्यमंत्री अजित पवार

Archana Banage

अजित पवारांवर शरद पवार विश्वास ठेवत नाहीत- अजयकुमार मिश्रा

Archana Banage

रेल्वेब्रिजवरून उडी घेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, देव बलवत्तर म्हणून…

Rahul Gadkar

राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर; तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिकांच्या नावाची चर्चा

Archana Banage

ओडिशा : बारावीची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची माहिती

Tousif Mujawar

महाराष्ट्रात थंडी पुन्हा वाढणार

datta jadhav