Tarun Bharat

कोल्हापुरात कोरोनाचा दुसरा बळी

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापुरात आज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 17 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यातच आज कोरोनामुळे जिल्ह्यातील दुसरा बळी गेला आहे. पन्हाळा तालुक्यातील मानवाड येथील एकाच कुटुंबातील 10 जण मुंबई येथून कोल्हापुरात आले. शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांची कोरोना तपासणी झाली. तपासणी दरम्यान मृत्यू झालेल्या 38 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी केम्पिपाटील यांनी दिली.

मृत तरुणावर कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. या तरुणाच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात मृतांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी इलकरंजीतील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 67 झाली असून 52 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

Related Stories

मळणी यंत्रात हात अडकून शेतकरी गंभीर जखमी

Abhijeet Khandekar

खंबाटकीतील नवीन बोगदा मार्चपर्यंत पूर्ण होणार-मंत्री गडकरी

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त संख्येत वाढ

Archana Banage

सीमा बांधवांच्या समर्थनात करवीर तालुक्यातील शिवसैनिक उतरले मैदानात

Archana Banage

दाजीपूर अभयारण्यातील 29 गावांचे प्रतिबंधित अधिकार लवकरच पुर्ववत

Archana Banage

खूनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कारावास

Abhijeet Khandekar