Tarun Bharat

कोल्हापुरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू; 4 जण कोरोनामुक्त

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने शहरातील वाशी नाका परिसरातील 79 वर्षीय पुरूषाचा खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत 9 नवे रूग्ण दिसून आले, तर चौघे कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील सध्याची सक्रीय रूग्णसंख्या 86 आहे. दिवसभरात 429 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

जिल्ह्यात बुधवारी 79 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1726 झाली आहे. ग्रामीण भागात 849, नगरपालिका क्षेत्रात 348, शहरात 374 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे. सध्या 86 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 429 जणांची तपासणी केली. त्यातील 153 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून बुधवारी 711 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 695 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 41 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 138 रिपोर्ट आले, त्यापैकी 130 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 1, भुदरगड 2, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 1, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 5 व अन्य 0 असे 9 रूग्ण आहेत. दिवसभरात चौघांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 147 झाली आहे. नव्या 9 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 959 झाली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.

Related Stories

आर के नगर विद्युत वितरण कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार थांबेना

Abhijeet Shinde

इतक्या उशिरा चौपाटी सुरु करण्यामागचे गौडबंगाल काय?

Patil_p

भाजपवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, बाळासाहेब असते तर…

Abhijeet Shinde

रेल्वे इंजिनच्या धडकेत चिंचवाड येथील महिलेचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : घरफाळा घोटाळा प्रकरण : दिवाकर कारंडेंसह चार जणांवर फौजदारी

Abhijeet Shinde

खवल्या मांजराची शिकार रोखण्यासाठी अभ्यासगट

Patil_p
error: Content is protected !!