Tarun Bharat

कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या अडीचशेवर

दिवसभरात 32 पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या 260 वर

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्हय़ात शुक्रवारी रात्रीपर्यत 32 जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 260 वर पोहोचली आहे. दिवसभरात 615 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.

सीपीआर हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी 146 जणांची तपासणी करण्यात आली. नवीन 9 रूग्ण दाखल झाले. आंतररूग्ण विभागात 191 जण उपचार घेत आहेत. दिवसभरात तपासणीसाठी 924 स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 624 स्वॅबचे रिपोर्ट आले आहेत. यामध्ये 615 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 9 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. सीपीआरच्या आयपीडीमध्ये सध्या 96 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 14 जणांची प्रकृती गंभीर आहेत. अन्य 106 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर जिल्हय़ातील अन्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.

दरम्यान, रात्री आठच्या सुमारास 32 रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रूग्णसंख्या 260 पर्यत पोहोचली. हा आकडा रात्री उशिरा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान दिवसभरात 1 हजार 228 जणांची तपासणी करून 398 जणांचे स्वॅब घेण्यात आले. जिल्हय़ात 20 ठिकाणी स्वॅब घेतले जातात. शुक्रवारी यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये 238 जणांची तपासणी करून 37 जणांचे स्वॅब घेतले.

इचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलमध्ये 79 जणांची तपासणी करून 2 स्वॅब घेतले. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 29 जणांची तपासणी करून 11 स्वॅब घेतले. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये 133 जणांची तपासणी करून 5 स्वॅब घेतले. गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात 67 जणांची तपासणी करून 16 स्वॅब घेतले. चंदगड कोरोना केअर सेंटरमध्ये 69 जणांची तपासणी करून 33 स्वॅब घेतले. आजरा केअर सेंटरमध्ये 121 जणांची तपासणी करून 40 स्वॅब घेतले.

राधानगरी कोव्हीड केअर सेंटरमध्ये 77 जणांचे स्वॅब घेतले. हातकणंगले केअर सेंटरमध्ये 4 स्वॅब घेण्यात आले. कागल केअर सेंटरमध्ये 49 जणांची तपासणी करून 51 स्वॅब घेतले. भुदरगड ग्रामीण रूग्णालयात 64 जणांची तपासणी करून 10 स्वॅब घेतले. गगनबावडा केअर सेंटरमध्ये 10 जणांची तपासणी करून 3 स्वॅब घेतले. पन्हाळा ग्रामीण रूग्णालयात 130 जणांची तपासणी केली. शाहूवाडी ग्रामीण रूग्णालयात 72 जणांची तपासणी करून 57 स्वॅब घेण्यात आले. शिरोळ केअर सेंटरमध्ये 31 स्वॅब घेतले. हातकणंगले एसजीआय केअर सेंटरवर 80 जणांची तपासणी करण्यात आली.

तीन दिवसांत एक रिपोर्ट दोनदा पॉझिटिव्ह

दरम्यान, 20 मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाचा स्वॅब परत पाठवला होता. त्याचाही रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे दिवसभरात असलेली 32 पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या रात्री 31 वर आली त्यामुळे 260 वरून पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 259 वर आल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.

Related Stories

रामाच्या गोटात मोबाईल टॉवर उभारण्याला विरोध

Patil_p

कोल्हापूरचा अनिकेत ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबशी करारबद्ध

Abhijeet Khandekar

चोरीला गेलेले सोने तब्बल 22 वर्षानंतर परत

Abhijeet Khandekar

मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती शरनारू यांना बलात्कार प्रकरणी अटक

Archana Banage

कोल्हापूर : सुट्टीच्या दिवशी उपायुक्त ‘ऑन ड्युटी’!

Archana Banage

शाळेच्या सचिवाची मुख्याध्यापकास जीवे मारण्याची धमकी देत मारहाण

Archana Banage