Tarun Bharat

कोल्हापुरात कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांमध्ये वाढ

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 9 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 514 नवे रूग्ण आढळले तर 502 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 4 हजार 273 आहे. कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णांमध्ये काही अंशी वाढ झाली आहे. दिवसभरात भुदरगड तालुक्यात नवी रूग्ण नोंद निरंक राहिली. दिवसभरात 24 हजार 22 कोरोना टेस्ट करण्यात आल्या.

जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने 9 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 591 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 988, नगरपालिका क्षेत्रात 803, शहरात 1 हजार 213 तर अन्य 587 आहेत. दिवसभरात 502 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 90 हजार 022 झाली आहे. गेल्या 24 तासांत 514 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 16, भुदरगड 0, चंदगड 4, गडहिंग्लज 24, गगनबावडा 1, हातकणंगले 70, कागल 18, करवीर 100, पन्हाळा 31, राधानगरी 3, शाहूवाडी 32, शिरोळ 90, नगरपालिका क्षेत्रात 70, कोल्हापुरात 47, तर अन्य 8 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 99 हजार 886 झाली आहे.

सांगलीतील एकाचा तर कोल्हापूर शहरात देघांचा कोरोनाने मृत्यू

शहरात गुरूवारी 47 नवे रूग्ण दिसून आले. तसेच ताराबाई पार्क आणि शुक्रवार पेठेतील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. परजिल्ह्यातील सांगली येथील एकाचा मृत्यू झाला.

कोरोना रूग्ण : 514 एकूण : 1,99,886
कोरोनामुक्त : 502 एकूण : 1,90,022
कोरोना मृत्यू : 9 एकूण मृत्यू : 5591
सक्रीय रूग्ण : 4273

Related Stories

इचलकरंजीत कोले मळा परिसर सील

Archana Banage

कोल्हापूर : ‘ग्रामसमृद्धी’ योजना चांगली, अंमलबजावणीची गरज

Archana Banage

आजऱ्यात सोळा लाखाचा गुटखा जप्त

Abhijeet Khandekar

सातवे येथे मोटरसायकल-मोपेडच्या धडकेत एक ठार

Archana Banage

मणेरमळा व गडमुडशिंगी येथील दोन घरफोड्या उघडकीस, सराईत चोरटा जेरबंद

Archana Banage

कोल्हापूर : वादळी पावसामुळे गांधीनगर येथे नुकसान

Archana Banage