Tarun Bharat

कोल्हापुरात दिवसभरात 45 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements

आजअखेर पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पोहोचली 179 वर

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असून बुधवारी ही रूग्ण संख्या 45 ने वाढली आहे. यामुळे जिल्हयातील आजअखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 179 वर पोहोचली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 

कोल्हापूर जिह्यात रेडझोनमधून येणाऱयांमुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत बुधवारी आणखी 45 रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्हयातील आजअखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 179 वर पोहोचली आहे. जिल्हा आरोग्य विभागातर्फे कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयित 16 हजार 356 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी आजअखेर सुमारे 8 हजार 184 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच 7 हजार 942 रुग्णांचे अहवाल अप्राप्त, 11 रुग्णांचे रिपिट सॅम्पल तर 40 रुग्णांचे नमुन्यांचा अहवाल रिजेक्ट करण्यात आलेला आहे. जिल्हयात आजअखेर 13 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच खासगी लॅब अंतर्गत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 56 स्वॅब नमुन्यांपैकी 47 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर 9 रुग्णांचे अहवाल अप्राप्त आहेत.

दरम्यान, सोमवारी रात्री जिह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 83 होती. यामध्ये मंगळवारी एकाच दिवसांत 39 नव्या रुग्णांची भर पडली. मंगळवारी जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 134 इतकी होती. बुधवारी आणखी 45 कोरोना पॉ†िझटिव्ह रुग्णांची भर पडल्यामुळे जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 179 वर पोहोचली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

मंगळवार रात्री 8 पर्यंतची आकडेवारी

बुधवारी दिवसभरात 45 पॉझिटिव्ह

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आकडा 179

बरे झालेले रुग्ण 13

उपचार सुरु असणारे रुग्ण  165

मृत  2

बुधवारी सकाळी 136 वर कोरोना पॉझिटिव्ह

 गेल्या 3 दिवसांपासून कोव्हिड – 19 संसर्गाचा फैलाव कोल्हापूर जिल्हयात वेगाने होत आहे. बुधवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 136 इतकी होती. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई व सोलापूर या †िठकाणाहून रेड झोन व कंटेन्टमेंट झोनमधून प्रवासी नागरिक मोठया प्रमाणात कोल्हापूर जिल्हयात आले आहेत. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढली असून बुधवारी दिवसभरात 45 रुग्णांची वाढ झाली. आजअखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 179 वर पोहोचली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Related Stories

उचतमधील दोन बाधितांच्या संपर्कात 420 जण

Abhijeet Shinde

वादळी पावसाने उद्योग व्यवसायिकांचे कोट्यावधींचे नुकसान

Abhijeet Shinde

राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये- चंद्रशेखर बावनकुळे

Archana Banage

कोल्हापूर : धबधबेवाडीत कोरोनाने एकाचा बळी

Abhijeet Shinde

रेशन दुकानदारांतर्फे हातकणंगले तालुक्यात ७ हजार तिरंगा वितरित

Abhijeet Shinde

कोरोना मदत कार्यास नागरीकांनी सहकार्य करावे – मुख्याधिकारी काटकर यांचे आवाहन

Patil_p
error: Content is protected !!