Tarun Bharat

कोल्हापुरात फुटबॉल खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी सुरू

कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) चा उपक्रम

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने (केएसए) आगामी साखळी सामन्यांसाठी फुटबॉल खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे.
पहिल्या दिवशी ३९ खेळाडूंची नोंदणी झाली असून केएसएचे सचिव अमर सासणे म्हणाले की,”वरिष्ठ गटातील 16 संघांसाठी 320 खेळाडूंनी नोंदणी करणे अपेक्षित आहे. यंदा फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्यांनाच नोंदणी करण्याची परवानगी असेल.”

संगणकतज्ज्ञ गिरीश बारस्कर यांनी नोंदणीसाठी वेबसाइट तयार केली असून या वेबसाईटवर खेळाडू पासवर्डसह लॉग इन करू शकतात आणि फॉर्म फी भरल्यानंतर आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, हिरवा दिवा नोंदणीची पुष्टी झाल्याचे सूचित करेल. ही प्रक्रिया २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे,’ असे सासणे यांनी सांगितले.

Related Stories

कबनूर शहरातील नामवंत डॉक्टराच्या कुटुंबातील पाच जण पॉझिटिव्ह

Archana Banage

वारणा सह. दूध संघाच्या संचालिका महानंदा देशमुख यांचे निधन

Archana Banage

तबलिगी जमातीच्या 2550 परदेशींना 10 वर्षांसाठी भारतात बंदी

datta jadhav

देशवासियांना ‘अर्थसंकल्पा’ची उत्सुकता

datta jadhav

अनिल देशमुखांच्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाची ईडीकडून तपासणी

Archana Banage

रविवारीच पार पडणार ‘नीट’

Patil_p