Tarun Bharat

कोल्हापुरात सक्रीय रूग्णसंख्येत घट, कोरोनामुक्तांमध्ये वाढ

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात शुक्रवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 605 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 727 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 15 हजार 771 झाली आहे. सक्रीय रूग्णसंख्येत घट झाली असून कोरोनामुक्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाखांकडे पोहोचली आहे, ग्रामीण भागात आजपर्यत कोरोनाने 2000 जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 855 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 8, नगरपालिका क्षेत्रात 601, शहरात 775 तर अन्य 471 आहेत. मृतांमध्ये जिल्हय़ांतील 30 जण आहेत. दिवसभरात 1 हजार 727 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 99 हजार 755 झाली आहे.

जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 1 हजार 605 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 47, भुदरगड 27, चंदगड 42, गडहिंग्लज 33, गगनबावडा 10, हातकणंगले 212, कागल 34, करवीर 306, पन्हाळा 110, राधानगरी 35, शाहूवाडी 24, शिरोळ 78, नगरपालिका क्षेत्रात 179, कोल्हापुरात 407 तर अन्य 61 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 19 हजार 381 झाली आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून शुक्रवारी 2 हजार 956 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 447 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 3 हजार 254 अहवाल आले. त्यातील 2 हजार 764 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 2 हजार 71 रिपोर्ट आले. त्यातील 1 हजार 415 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 8 हजार 281 स्वॅब रिपोर्ट आले.

दरम्यान, शुक्रवारी कोरोनाने मृत्य़ू झालेल्यांत शहरातील जरगनगर, बापट कॅम्प, एकटी संस्था, राजारामपुरी, सर्वेश पार्क फुलेवाडी, सावित्री पार्क, आर. के. नगर येथील तर परजिल्हय़ांतील मृत्यूमध्ये नेर्ले वाळवा, शेंद्री सातारा, निपाणी व चिक्कोडी कर्नाटक येथील व्यक्तींचा समावेश आहे.

कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 407 1198 1605
आजपर्यतचे बाधीत 34214 85167 1,19,381
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1727 99755
दिवसभरातील मृत्यू 6 30 34
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 775 3080 3855
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 459 2447 2956
अँटीजेन 490 2764 3254
ट्रुनेट 656 1415 2071

Related Stories

गांधीनगरमधील अपघातग्रस्तास मुख्यमंत्री निधीतून धनादेश

Archana Banage

मोक्का न्यायालयाकडून तेलनाडे बंधू फरार घोषित

Archana Banage

कोल्हापूर मेडिकल व स्पोर्टस हब होण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी योगदान द्यावे

Abhijeet Khandekar

पन्हाळा नगरपरिषदेचा अजब कारभार,काम आधी आणि टेंडर नंतर

Archana Banage

नवरात्रोत्सवाला आजपासून प्ररंभ

Archana Banage

शिरोळ येथे ट्रॅक्टर वरून पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!