Tarun Bharat

कोल्हापुरात हजारो परप्रांतीय मजूर रस्त्यावर

Advertisements

कोल्हापुर / प्रतिनिधी

कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या मजुरांचं काम लॉकडाऊमुळे बंद आहे. खाण्यापिण्याची व्यवस्थाही नाही. 15 दिवसांपासून खाण्यासाठी काही मिळालं नसून आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या. अशी मागणी करत हजारो परप्रांतीय मजूर गावी जण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत तर काही छोट्या उद्योगांना कायमचं टाळं लागायची वेळ आली आहे. अनेक मजुरांचं कामंही बंद झाल्यानं एक वेळचं खाण्यासाठी पैसे नाहीत अशी भ्रांत निर्माण झाल्यानं कामगार मिळेल त्या मार्गानं आपल्या गावी परतत आहेत. अनेक मजुरांची अजूनही आपल्या गावी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. कोल्हापुरातील अनेक मजूर बांधवांचा अखेर संयम सुटला आणि गुरुवारी मजुरांनी महामार्ग रोखला.

कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या मजुरांचं काम लॉकडाऊमुळे बंद आहे. खाण्यापिण्याची व्यवस्थाही नाही. 15 दिवसांपासून खाण्यासाठी काही मिळालं नसल्याचा दावा या मजुरांनी केला. आपल्या मूळ गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी या सर्व मजुरांनी केली आहे.

Related Stories

एम.एस.सी.आय.टी. प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यास परवानगी

Abhijeet Shinde

चुये येथे युवतीची आत्महत्या

Abhijeet Shinde

अंगणवाडी पोषण आहार पुरवणाऱ्या बचत गटांना शासनाच्या मदती गरज

Abhijeet Shinde

आनेवाडी टोल नाक्यावर युवकांच्यात मारामारी

Patil_p

आर्यन खान २६ दिवसांनंतर तुरुंगाबाहेर

Abhijeet Shinde

जिल्हा परिषदेकडून 3 लाख तिरंगा झेंडे वितरीत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!