Tarun Bharat

कोल्हापुरात 1 किलो हस्तीदंतासह कार जप्त, तिघांना अटक

कोल्हापुरातील टोळी, संशयितांकडून कार, दुचाकी, 3 मोबाईल जप्त, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त, आज न्यायालयात हजर करणार

प्रतिनिधी / कोल्हापूर

केरळमधून कोल्हापुरात हस्तीदंत विक्रीसाठी आलेल्या तिघांना वन विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी पन्हाळा येथे अटक केली. त्यांच्याकडून 1 किलो हस्तीदंत, कार, मोटारसायकल, 3 मोबाईल असा 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. टोळीतील संशयित कोल्हापूर जिल्हÎातील असल्याची माहिती वन विभागातून देण्यात आली.

संशयित माणिक विलास इनामदार (वय 59, रा. परळी निनाई, ता. शाहूवाडी), सागर आबासाहेब साबळे (वय 32, रा. माले, ता. पन्हाळा) आणि धनंजय केरबा जगदाळे (वय 21, रा. शिंगणापूर, ता. करवीर) हे इनोव्हा कारमधून केरळ येथून हस्तीदंत विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार बुधवारी सकाळपासून वन विभागाच्या भरारी पथकाने सापळा लावला. दरम्यान,. सायंकाळी हे तिघे संशयित कोल्हापूर पन्हाळा मार्गावर हॉटेल ग्रीनफिल्डनजिक आले. यावेळी वन विभागाच्या भरारी पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

भरारी पथकातील वनाधिकारी युवराज पाटील,. साताराचे वनाधिकारी सचिन डोंबळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वन्यजीव अभ्यासक हेमंत केंजळे, कर्मचारी गजानन भोसले, रॉकी देसाई, दीपक गायकवाड, विजय भोसले, सुहास पवार, सागर पटकारे, चालक संजय मंडले, दिनेश नेहरकर, प्रदीप भोसले यांनी संशयितांची झडती घेतली असता कारमध्ये 1 किलो हस्तीदंत मिळून आले. पथकाने इनोव्हा कारसह, मोटारसायकल, 1 किलो हस्तीदंत, 3 मोबाईल असा 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित तिघांना अटक केली आहे. त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती भरारी पथकाचे वनाधिकारी युवराज पाटील यांनी दिली.

हस्तीदंताची तपासणी होणार, त्यानंतर मुल्य ठरणार

पन्हाळा येथे संशयितांकडून जप्त केलेल्या हस्तीदंताची तपासणी होणार आहे. त्यानंतरच त्याचे मुल्य ठरणार आहे. हस्तिदंताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे त्याची किंमत कोटÎावधीत आहे. केरळ येथून हे हस्तीदंत आणल्याची माहिती संशयितांनी दिल्यामुळे ते खरे असण्याची शक्यता अधिक आहे. प्रथमच जिल्हÎातील हस्तीदंत विकणारी टोळी वन विभागाच्या रेकॉर्डवर आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Related Stories

पाण्याच्या प्रवाहाबरोबर राष्ट्रीय महामार्गावर मासे, मासे पकडण्यासाठी उडाली झुंबड

Archana Banage

ओमिक्रॉनमुळे भारतावर पुन्हा आर्थिक संकट ?

Abhijeet Khandekar

वीस लाखाची खंडणी मागणाऱ्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

Archana Banage

केर्ली येथे अपघातात निवृत्त पोलीस निरीक्षक ठार

Archana Banage

साखर संघाकडून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचे काम

Archana Banage

बंदला आजर्‍यात प्रतिसाद 

Archana Banage