Tarun Bharat

कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा रद्द

प्रतिनिधी / कोल्हापूर

भारतासह परदेशातही प्रसिद्ध असणारा कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा यंदा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांचे आरोग्य डोळÎासमोर ठेवून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यात सोमवारी महत्वपूर्ण चर्चा झाल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वतीने शाही दसऱयांची गेली अनेक वर्षे जपण्यात आली आहे. छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट, दसरा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी या शाही दसऱयांचे ऐतिहासिक दसरा चौकात आयोजन केले जाते. या सोहळ्यात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे आणि छत्रपती घराण्यातील इतर सदस्य तमाम करवीरवासियांच्या साक्षीने शमी पूजन करून विजयादशमीचा हा सोहळा साजरा करत असतात.

मेबॅक कारमधून या सोहळ्यासाठी येणारे छत्रपती घराणे आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी-छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरू महाराजांची पालखी या सोहळÎास मानाने सहभागी होत असतात. यावेळी बंदूकांची फैरी झाडल्या जातात. त्याचबरोबर विविध सरदार, सरकार घराण्यांसह मानकरी आणि मान्यवरांची उपस्थिती या सोहळÎात असते. सूर्यास्तावेळी शमी पूजन झाल्यानंतर सोने लुटण्याच्या सोहळÎाला होत असतो. हजारो कोल्हापूरकर आणि परजिल्हÎातील नागरिक यावेळी उपस्थित राहतात. प्रचंड उत्साह आणि धार्मिक परंपरा जपत होणाऱया या सोहळÎावेळी दसरा चौक गजबलेला असतो. या ठिकाणी खेळण्यांचे, खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेले असतात. अशी परंपरा लाभलेला कोल्हापूरचा शाही दसरा यंदा मात्र साजरा होणार नाही.

शाहू महाराज, जिल्हाधिकारी देसाई यांच्यात बैठक

शाहू महाराज आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यात सोमवारी दुपारी न्यू पॅलेसवर अत्यंत महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत शाही दसऱयाची परंपरा, कोरोनामुळे सध्या असलेली स्थिती आणि संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची दक्षता यावर सविस्तर चर्चा झाली. शाही दसऱयाच्या सोहळÎावेळी होणारी प्रचंड गर्दी पाहता कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य जपण्याला पहिल्यांदा प्राधान्य देत यंदाचा शाही दसरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी याची नोंद घेऊन स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.

शाही दसरा ही आपली ऐतिहासिक परंपरा असली तरी नागरिकांचा जीव लाख मोलाचा आहे. गर्दी झाली तर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वरूपात साजरा होणारा हा सण यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. -श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

शाही दसरा रद्द करण्यासाठी शाहू महाराजांनी मान्यता दिली. त्यांनी यापूर्वीच हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात आज आम्ही त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. सोहळा रद्द करण्यासाठी त्यांनी सहमती दिली. कोरोनाच्या संकटात हा निर्णय महत्वाचा आहे. -दौलत देसाई, जिल्हाधिकारी कोल्हापूर

सार्वजनिक दसरा साजरा करण्यास बंदी

ऐतिहासिक शाही दसरा रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हÎात सार्वजनिकरित्या दसरा सोहळा साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्या संदर्भातील आदेश काढण्यात येणार आहेत. नागरिकांनी सार्वजनिकरित्या दसरा साजरा करू नये. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच शाही सोहळा रद्द

करवीर संस्थानच्या शाही दसऱयाला मोठी परंपरा आहे. संस्थानकाळापासून अत्यंत उत्साहाने हा सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साजरा होत असतो. गेल्या शंभर वर्षांत प्रथम हा सोहळा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे.

Related Stories

आपत्ती काळात पुनर्वसन मंत्री नाही हे दुर्दैव !

Archana Banage

Kolhapur-Mumbai flight : पाच दिवसांत 317 प्रवाशांचा प्रवास; कोल्हापूर- मुंबई विमानसेवेला प्रतिसाद

Abhijeet Khandekar

कोल्हापूर विमानतळाला आमदार ऋतुराज पाटील यांची भेट

Archana Banage

दीड वर्षात अंत्यसंस्कारासाठी पावणे दोन कोटींचा खर्च

Archana Banage

कोल्हापूर : पुरबाधित ऊस प्रधान्याने तोडण्यासाठी 21 ला व्यापक बैठक

Archana Banage

काेल्हापूर : उचगाव येथे महिला कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage