Tarun Bharat

कोल्हापूरची टेबल-टेनिसस्टार वैष्णवीचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

बेस्ट स्पोर्टस् पर्सन वुईथ डिसऍबिलिटी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान\

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

दिव्यांगावर मात करत गेल्या दहा वर्षात तब्बल 16 आंतरराष्ट्रीय टेबल-टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधी करुन 2 कांस्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत 7 सुवर्ण, 1 रौप्य पदक जिंकल्याची दखल घेऊन कोल्हापूरची दिव्यांग टेबल टेनिसस्टार वैष्णवी सुतार हिला भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमिकरण विभागाकडून `बेस्ट स्पोर्टस् पर्सन वुईथ डिसऍबिलिटी’ या पुरस्कारने शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वैष्णवीला पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व 1 लाख रुपये असे त्याचे स्वरुप आहे. नवी दिल्लीतील विज्ञानभवनात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार हे उपस्थित होते.

वैष्णवीला भारत सरकारकडून मिळालेल्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामागे तीने घेतलेले कष्ट आणि दाखलेली जिद्द कारणीभूत ठरली आहे. अकरावीपर्यंत शिकत असताना ती इतर मुलींप्रमाणे धडधाकट होती. खो-खो व कबड्डी ही खेळत होती. मात्र तिची जेव्हा अकरावी झाली, तेव्हा तिला अचानक मस्क्युलर डिस्ट्रॉफी (मास आणि पेशींमधील कमकुवतपणा) हा विकार असल्याचे दिसून आला आणि खो-खो व कबड्डी करिअर करण्याची स्वप्नेच गळून पडली. तीला खो-खो व कबड्डी खेळणे बंद करावे लागले. पुढे तीने विकाराचा त्रास सहन करत वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. 2004 साली रविवार पेठ, माळी गल्लीतील विनायक सुतार यांच्याशी तिचा विवाह झाला. पुढील सात वर्षांनी तीने टेबल टेनिसच्या सरावाला सुरुवात केली. आपल्यातील दिव्यांगत्व विसरुन जाऊन तीने कसून सराव करत आपल्याला स्पर्धेत सहभागी होता येईल, इतकी तयारी केली. याच तयारीच्या जोरावर वैष्णवीने चीन, जपान, थायलंड, तैवान, इंडोनेशिया, दक्षिण कोरीया, जॉर्डन, अमेरिका, स्पेन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया व इजिप्तसह अन्य देशात झालेल्या 16 आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले. 2 कांस्य पदके देखील जिंकली. राष्ट्रीय स्पर्धेतही बहारदार कामगिरी करत 7 सुवर्ण, 1 रौप्य पदकांची कमाई केली. या बहुमोल कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमिकरण विभागाकडून वैष्णवीला `बेस्ट स्पोर्टस् पर्सन वुईथ डिसेऍबिलिटी’ या पुरस्कारने गौरवले. वैष्णवीला केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, केएसए टेबलटेनिस सेंटरचे प्रशिक्षक संग्राम चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

टेबल-टेनिसमध्ये अशी आहे वैष्णवी सुतारची रॅकिंग..

  • भारतात – पहिला क्रमांक
  • वर्ल्ड रॅकिंग – बाविसावा क्रमांक
  • आशियाई रॅकिंग – आठवा क्रमांक

Related Stories

महापुराच्या धास्तीने प्रयाग चिखलीकरांकडून जनावरांचे स्थलांतर सुरु

Abhijeet Khandekar

अमेरिकन ओपन स्पर्धा आजपासून

Patil_p

मिस इंडिया दिल्ली 2019 च्या मानकरी मानसी सहगल यांचा ‘आप’ पक्षात प्रवेश

Rohan_P

टय़ुनिशियाचा भारतावर निसटता विजय

Patil_p

वर्ल्डकपमध्ये आज लंका-नामिबिया यांच्यात सलामी

Patil_p

पाक संघाकडून झिंबाब्वेला ‘फॉलोऑन’

Patil_p
error: Content is protected !!