Tarun Bharat

कोल्हापूरच्या माहेश्वरी यांनी ऑस्ट्रेलियात फडकवला तिरंगा

आयर्नमॅन 70.3 स्पर्धेत जीगरबाज कामगिरी

कोल्हापूर प्रतिनिधी

मेलबर्न (आस्ट्रेलिया) येथे झालेली अतिशय खडतर अशी आयर्नमॅन 70.3 स्पर्धा कोल्हापूरची सुपुत्री माहेश्वरी झुंजार सरनोबत-शेळके यांनी जिद्दीच्या जोरावर 18 व्या क्रमांकाने पूर्ण करत भारताचा तिरंगा लहरला. भारतातर्फे माहेश्वरी ह्या एकमेव स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे 1.9 किलो मीटरचे पोहणे, 90 किलो मीटर सायकलिंग व 21 किलो मीटर धावणे असे खडतर आंतर नऊ तासात पूर्ण करणे बंधनकारक असते. मात्र जीगरबाज माहेश्वरी यांनी हेच आंतर केवळ 6 तास 55 मिनिट, 40 सेकंदात पूर्ण करण्याचा पराक्रम करुन दाखवला केला.

माहेश्वरी ह्या 40 ते 44 या वयोगटातून सहभागी झाली होती. या वयोगटातून अमेरिका, पॅनडा, लंडन, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जर्मनी, ऑस्ट्रीया, फ्रान्ससह विविध देशातील स्पर्धेक सहभागी झाल्या होत्या. या सर्व स्पर्धकांना भारी पडत माहेश्वरी यांनी स्पर्धेचे नियोजित आंतर कमी वेळेत पूर्ण केले. स्पर्धेमध्ये 1.9 किलो मीटर समुद्रात पोहणे बंधनकारक होते. हे आंतर पोहताना माहेश्वरी यांना 12 अंश सेल्सिअस तापमानाशी सामना करावा लागला. असे असूनही आत्मशक्तीच्या जोरावर माहेश्वरी यांनी पोहण्याचे आंतर 43 मिनिट 48 सेकंदात पूर्ण केले.
माहेश्वरी यांनी पूर्वी स्विर्त्झलंडमध्ये झालेल्या फुल आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण स्पर्धेचे नियोजित आंतर पूर्ण करताना त्यांना दुखापती झाली. त्यामुळे त्यांना स्पर्धा पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे त्यांनी मेलबर्न (आस्ट्रेलिया) येथे होणाऱया आयर्नमॅन 70.3 स्पर्धेत सहभागी होऊन ती पूर्ण क्षमतेने पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार पोहण्याचा सराव पतोडी खण व भवानी जलतरण तलावात तर सायकलिंगचा सराव पुणे-बेंगळूर महामार्गावर केला. तसेच धावण्याचा सराव कात्यायणी रोड केला होता. या सरावाच्या जोरावर माहेश्वरी यांनी मेलबर्नमधील आयर्नमॅन 70.3 स्पर्धेत जीगरबाज कामगिरी केली. या कामगिरीसाठी प्रशिक्षक आशिष रवळू यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

गोकुळची निवडणूक होणारच

Archana Banage

पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या 6907 वर

Tousif Mujawar

दौलताबाद किल्ल्याचे नाव देवगिरी करणार, पर्यटन मंत्री लोढांची घोषणा

Archana Banage

दिलासादायक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 12,326 रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट 65.37 टक्के

Tousif Mujawar

मंत्रीपद विस्ताराबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

Archana Banage

राज्यातील घडोमोडीवर मुख्यमंत्री काय बोलणार? मुख्यमंत्री कार्यालयाकडून नविन ट्विट

Kalyani Amanagi