Tarun Bharat

कोल्हापूरच्या युवकाचा अपहरणाचा बनाव उघड

वार्ताहर/ भुईज़

महामार्गावर भुईंज पोलिसांना सापडलेल्या त्या कोल्हापूरच्या युवकांबाबत तपासासाठी कोल्हापूरचे ए. टी. एस. पथक आणि एल. सी. बी. पथक व करवीर पोलीस ठाण्याचा फौजफाटा भुईज पोलीस ठाण्यात दाखल होण्याआधीच भुइं&ज पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे व त्यांच्या सहकाऱयांनी कार्यकुशलतेने त्या युवकावर ताबा मिळवला. मात्र शेवट पोलीस चौकशीत सुशांत बाबासो पाटील (रा. सुपिरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या युवकाने आपल्या अपहरणाचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले.

  याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी भुईंज पोलिसांना आनेवाडी टोलनाका ते उडतरे या गावाचे दरम्यान एक अनोळखी युवक मिळून आला. तो महामार्गावर असलेल्या सेवा रस्त्यावर उसाच्या शिवारात सापडला. त्याच्या जवळ बॅग व इतर साहित्य तसेच काही अंतरावर दुचाकी सापडली. भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे व त्याच्या सहकारी स्टापने त्या युवकास भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून उपचार सुरू केले. त्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी पाच वाजता त्यास पुन्हा भुईंज पोलीस ठाण्यात आणून कोल्हापूर येथून आलेल्या एलसीबी पथकाचे स्वाधीन केले. यावेळी करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत अमृतकर, करवीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, पी एस आय विवेकानंद राळेभात, पोलीस हवालदार तुषार कांबळे, पोलीस नाईक अशोक मंत्रे, सागर काडगावकर हे करवीर (ता. कोल्हापूर) येथून आले होते.

   सदर युवकाचे नाव सुशांत बाबासो पाटील (रा. सुपिरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे असून त्याचे नेमके अपहरण की घातपाताचा प्रकार याचा तपास कोल्हापूर पोलीस व भुइं&ज पोलीस ठाण्याचे अधिकारी आशिष कांबळे, विकास गंगावणे, प्रसाद दुदुस्कर, रविराज वर्णेकर आधी करीत होते.

  युवकाने केलेला अपहरणाचा वनाब व त्याच्या जवळ असलेली रक्कम व सोने हे पाहून पोलिसांना देखील वेगळाच संभाव येत होता. मात्र या युवकाच्या बनवाबनवीमुळे कोल्हापूर पोलिसांसह सातारा जिल्हा पोलीस यंत्रणा कितीतरी काळ आपल्या कर्तव्यात व्यस्त राहिली.

पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित सपोनि आशिष कांबळे यांचे विशेष कौतुक होत आहे.

Related Stories

कोल्हापूर : कबनुरातील कोरोना रुग्ण संख्या वाढतीच, एकाचा मृत्यू

Archana Banage

मराठा आरक्षणाची खेडेकर यांची मागणी चुकीची : हेमंत पाटील

Archana Banage

परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Archana Banage

जिल्हा हादरला; उच्चांकी 59 बळी

Patil_p

जिल्हयात 23 ठिकाणी अवैध दारु विक्रीवर कारवाई

Patil_p

कलिंगड उत्पादक शेतकऱ्याच्या मदतीला कृषी विभागाची धाव!

Archana Banage