Tarun Bharat

कोल्हापूरसह पंधरा जिल्ह्यात लॉकडाऊन वाढणार

प्रतिनिधी/मुंबई

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र असले तरी 15 जिह्यात अजूनही कोरोनाचे वाढते रुग्ण आहेत. तेथे रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. म्हणजे राज्यात कोरोनाची दुसरी लाट अजूनही आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यामुळे राज्यात जास्त रुग्ण असलेल्या जिह्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेत मिळत आहेत.

बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याशी ह्विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि कोरोना स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

कोरोना संसर्गितांचे बारकाव्याने निरीक्षण करा, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवा, मात्र होनम क्वारंटाईन करू नका, अशा सूचना देण्यात आल्याचे थोरात यांनी सांगितले.  कोरोना संख्या वाढत असलेल्या 15 जिह्यांचाही थोरात यांनी आढावा घेतला. येथील लोकांना पोलीस महासंचालकांनी सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार अधिक होत असून तेथे आता खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

आता खरीप हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे कामानिमित्त शेतकरी एकमेकांच्या संपर्कात येण्याच्या अधिक शक्यता आहेत. त्यातूनही हा संसर्ग अधिक फैलावण्याची शक्यता आहे. अशावेळी मुंबई मॉडेलप्रमाणे काम करण्याची आवश्यकता आहे. रुग्णवाढ होत असलेल्या 15 जिह्यातील जिल्हाधिकार्यांना तशा सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.  कोरोनाच्या पहिल्या लाटेत लग्नकार्यादी समारंभांना अधिक गर्दी झाली आणि त्याचा परिणाम दुसर्या लाटेत रुग्णवाढ होण्यात झाला. प्रशासन आपले काम करत आहे. पण नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. मुंबईतील सोसायटÎांचा पदाधिकार्यांना विशेष पोलीस अधिकार्यांचा दर्जा देण्यात आला आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागात ग्राम रक्षक दल तयार करण्यात यावे. त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. म्हणजे ते नागरिकांना सूचना देतील आणि नागरिकही त्यांचे ऐकतील. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीला आळा बसेल, असे थोरात म्हणाले. पुढील आठवडÎात पुन्हा त्या 15 जिह्यांचा आढावा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Related Stories

अपहार प्रकरणी सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांवर गुन्हा

datta jadhav

कंगनाच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने पाठवली नोटीस

Tousif Mujawar

पुणे विभागातील 9 लाख 93 हजार 630 जण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

राज्यात कोरोनाबाधित दोन हजार रुग्ण बरे होऊन घरी

Archana Banage

एकनाथ खडसेंच्या जावयाचा ईडी कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला

Archana Banage

पुण्यात स्कूलबस चालकांच्या कुटुंबांना धान्यरुपी मदत

Tousif Mujawar