Tarun Bharat

कोल्हापूरसह `या’ जिल्ह्यात हवामान आधारित पीक विमा योजना लागू

प्रतिनिधी / कोल्हापूर

खरीप हंगामासाठी राज्य सरकारने रिस्ट्रक्चर्ड वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम (आरडब्ल्यूबीसीआयएस) लागू केली आहे. यासाठी एचडीएफसी ऍग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड केली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

कोल्हापूर, जालना, लातूर, सातारा, परभणी, ठाणे, सांगली, औरंगाबाद, बीड, हिंगोली, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांतील कर्ज घेतलेल्या तसेच कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना २०२१ मधील खरीप हंगामासाठी ही योजना पुरवली जाणार आहे. रिस्ट्रक्चर्ड वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीमखालील (आरडब्ल्यूबीसीआयएस) सर्व उत्पादनांना कृषी विभागाने मंजुरी दिली आहे.

कोल्हापूर, सातारा, जालना, लातूर, परभणी, ठाणे, सांगली, औरंगाबाद, बीड, हिंगोली, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ घेता येणार आहे.

खाली दिलेल्या पिकांसाठी आरडब्ल्यूबीसीआयएसखाली विमा काढू शकतात.

राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक कृषी सहकारी संस्था (पीएसीएस), प्रादेशिक ग्रामीण बँक/सामाईक सेवा केंद्र (सीएससी) यांच्याद्वारे काढला जाऊ शकतो किंवा शेतकरी अधिकृत एचडीएफसी एजंटशी संपर्क साधू शकतात. शेतकरी पुढील वेबसाइटवर लॉगऑन करून किंवा स्वत:ची नोंदणी करूनही विमा काढू शकतात. https://pmfby.gov.in/farmerLogin

आरडब्ल्यूबीसीआयएस हंगामी नुकसानीपासून संरक्षण देऊ करते. यामध्ये डेफिसिट रेनफॉल कव्हर (पाऊस कमी होण्याच्या परिस्थितीत संरक्षण), कॉझिक्युटिव ड्राय डे कव्हर (सलग कोरडे दिवस गेल्यास संरक्षण), रिलेटिव ह्युमिडिटी कव्हर (तुलनात्मक आर्द्रता संरक्षण) आदींना महाराष्ट्र सरकारच्या कृषीखात्याने अधिसूचित केले आहे.

अधिसूचित जिल्ह्यांसाठी या योजनेखाली पुढील पिकांना संरक्षण देण्यात आले आहे

चिकू, डाळिंब, मोसंबी, लिंबू, संत्री, सीताफळ, पेरू आणि द्राक्षे.

Related Stories

सिध्दरामेश्वरांचे प्रतिक योगदंडाची भक्तीभावात पूजा

Archana Banage

बलात्काराच्या गुन्ह्यातील पीडितेकडून आरोपीला खंडणीची मागणी

Archana Banage

पडळकरांच्या निशाण्यावर राज्य सरकार; म्हणाले, हे तर षडयंत्र…

Archana Banage

सोलापूर : आगामी निवडणुकांसाठी एमआयएमची मोर्चेबांधणी

Archana Banage

बेमुदत शाळा बंद आंदोलन तूर्त स्थगित : रावसाहेब पाटील

Archana Banage

पुलाची शिरोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा

Abhijeet Khandekar