Tarun Bharat

कोल्हापूरसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना : राज्यमंत्री यड्रावकर

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापूर परिसरात दिवसभरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या दोन तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

कोल्हापूरमधील पावसाची स्थिती लक्षात घेऊन राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरला पाठविण्या बाबत मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील कोल्हापूरसाठी तत्काळ तुकड्या रवाना करण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले.

जिह्यातील 5 राज्यमार्ग व 9 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 14 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.

Related Stories

शिवसैनिकांच्या केसाला जरी हात लागला तर…ठाकरेंचा इशारा

Abhijeet Khandekar

उद्धव ठाकरेंना मत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला मत

datta jadhav

यंदाचा नोव्हेंबर १४२ वर्षांच्या इतिहासात चौथा सर्वाधिक उष्ण महिना

Abhijeet Khandekar

करवीर पोलिस उप अधीक्षकक्षपदी आर. आर. पाटील यांची नियुक्ती

Archana Banage

हैदराबादमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; 11 जणांचा होरपळून मृत्यू

datta jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार

datta jadhav