वार्ताहर/पाटगाव
भुदरगड तालुक्यातील अंतुर्ली व चाफेवाडी येथील क्वारंटाइन केलेले दोघेजण कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे पश्चिम भुदरगड परिसरात खळबळ माजली आहे. तर भुदरगड तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असून आत्तापर्यंत या परिसरात २० रुग्ण आढळले आहेत.
यातील चाफेवाडी येथील युवक हा आपल्या पत्नीसह मुंबई येथून 14 मे रोजी कागल येथे आला होता. तेथील शासकीय रूग्णालयात त्याचे स्वॅब घेण्यात आला होता. या कुटुंबातील तरुणाचा अहवाल २४ रोजी पॉझिटिव्ह आला आहे. तर अंतुर्ली येथील महिला आपल्या मुलासह मुंबई वरून १३ मे रोजी बाहेर पडली होती. या कुटुंबाचा स्वॅब कागल येथे १५ मे रोजी घेण्यात आला होता. रविवारी २४ मे रोजी महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.या दोन्ही कुटुंबाना शेतातील स्वतंत्र घरात क्वारंटाईन केले होते. त्यामुळे ते कोणाच्याही संर्पकात आले नव्हते दोघांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


previous post