Tarun Bharat

कोल्हापूर : अंधार रात्री सात तासांचा थरार… अन् अथक प्रयत्नातून अखेर त्या तिघांची जंगलातून सुटका

तिघेही पर्यटनासाठी गेले असता लोणी काळभोर (जि. पुणे) तीर्थक्षेत्र रामदरा जंगलात भरकटले.
सातशे मीटरहून अधिक खोल, स्वभोवती किरर्र झाडी, बिबट्याचा वावर, पडणारा पाऊस यावर जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांनी मात करीत अधिकाऱ्याचे कुटुंबाची केली शर्थने सुटका.

राजेंद्र होळकर / कोल्हापूर

रस्ता चुकल्यामुळे येथील तीर्थक्षेत्र रामदरा परीसरातील डोंगरात दाट झाडीत अडकलेला अधिकारी, त्याची पत्नी व बहिण अशा तीन जणांना पोलिसांनी सहा तासाहून अधिक अथक प्रयत्न करून शनिवारी मध्यरात्री दीड वाजता शशांक सुभाष विष्णोई (सध्या रा. कॅम्प पुणे, मूळगाव रा. राजस्थान), त्यांची पत्नी अलविना वय२५) व बहिण टीना (वय२२) या तीन पर्यटकांची सुटका लोणी काळभोर पोलिसांनी केली आहे. त्या रात्रीच्या अंधारात डोंगरदऱ्यात, बिबट्याचे भय समोर असतानाही, किर्र झाडीत तब्बल वीस किलोमीटरची पायपीट करून रस्ता चुकलेल्या या तीन जणांना पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे उपनिरीक्षक शिवाजी ननवरे या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांनी जीवदान दिले आहे.

शशांक विष्णोई हे केंद्रिय आयकर विभागाच्या जीएसटी पुण्यातील कार्यालयात निरीक्षक म्हणून काम पाहतात. शशांक विष्णोई यांना सुट्टी असल्याने परिसरात शशांक त्यांची पत्नी अलविना व बहिण टिना असे तिघेजण स्वतःच्या कारने हवापालट करण्यासाठी लोणी काळभोर हद्दीतील रामदरा परीसरात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास आले होते. शशांक यांनी कार रामदरा मंदिराच्या उजव्या बाजूला उभी केली व त्यानंतर तिघांनीही रामदरा फेरफटका मारण्यास केली. फेरफटका मारत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डोंगरावर गेले. त्या ठिकाणी फोटो काढून आल्यानंतर त्या रस्त्याने खाली उतरण्याऐवजी तिघेही विरुद्ध बाजुच्या म्हणजे पूर्व बाजुच्या दरीत उतरले.

दरीत उतरत असतांना अंधार पडल्याने, त्यांना आपण रस्ता चुकल्याची जाणीव झाली. यावेळी शशांक यांनी वर जाण्यासाठी रस्ता शोधण्यास सुरुवात केली. मात्र रस्ता शोधत असताना शशांकसह पत्नी व बहिण तिघेही रस्ता आणखीनच चुकले वर जाण्याच्या प्रयत्नात दरीत भरकटले. किर्र अंधारात रस्ताच मिळत नसल्याने तिघांचीही भितीने गाळण उडाली. मात्र, दरीतही मोबाईलला रेंज असल्याने शशांक यांनी गुगलवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा नंबर शोधून त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.

पोलिसांच्याकडे मदतीची याचना केली. ही बाब लोणी काळभोरचे प्रभारी पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना समजताच दोघांनीही रामदरा डोंगरात धाव घेतली. रामदरा परिसरात जाताच शिवाजी ननवरे यांनी शशांक यांना फोन करून नेमके कुठे आहात? अशी विचारणा केली. मात्र, शशांक हे खोल दरीत असल्यान त्यांना नेमके ठिकाण सांगता येईना. त्याच दरम्यान पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर, कर्मचारी रुपेश भगत व त्यांचे सहकारी वडकी गावच्या हद्दीतून डोंगरात शिरले होते. दरम्यान शशांक यांना अडकलेले स्थान नेमके सांगता आले नसले तरी, त्यांनी सांगितलेल्या खाणाखुणा लक्षात घेऊन, मानसिंग खोचे व शिवाजी ननवरे या दोघांनीही दरी उतरण्यास सुरुवात केली.

तीन दर्‍या खालीवर केल्यानंतर एका दरीतून शशांक यांचा आवाज ननवरे यांच्या कानावर पोचला. या आवाजाच्या दिशेने दरी उतरण्यास मानसिंग खोचे व शिवाजी ननवरे सुरुवात केली. मात्र दरीत उतरताना किरी झाडी त्यात पाऊस सुरु असल्याने झालेला निसरडा रस्ता यातूनही मार्ग काढत तब्बल पाच तासानंतर म्हणजे रात्री साडेबाराच्या सुमारास खोचे व ननवरे हे दोघेही शशांक यांच्याजवळ पोचले. तोपर्यंत ननवरे व खोचे या दोघांच्या प्रत्येकी एका तर शशांकसह पत्नी व बहिणीच्या मोबाईलची बॅटरी संपली होती. यामुळे पुढे जाण्यासाठी ननवरे यांनी डोंगरातून खाली जमीनीकडे वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा आधार घेतला. प्रवाह जसा खाली उतरेल तसतसे वरील पाचही जण लोणी काळभोर हद्दीतील मांडाळे परिसरात रात्री दिडच्या सुमारास उतरले. या दोघांनी तब्बल वीस किलोमीटर अंतर पार केले होते.

“शशांक बिष्णोई अडकलेले ठिकाण सुमारे सातशे मीटरहून अधिक खोल होते. किरर्र झाडी बिबट्याचा वावर पडणारा पाऊस व रात्रीची वेळ यामुळे बिष्णोई यांना वाचविण्यासाठी अधिक वेळ लागला. पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे, बारामतीचे सुनिल पवार, अभिजीत चव्हाण, माझे सहकारी संदीप बोरकर , रुपेश भगत, काही स्थानिक तरुण यांनी केलेल्या मदतीमुळे शशांक बिष्णोई यांच्या जवळ आम्हाला पोचता आले. ही कारवाई तब्बल सात तासांहून अधिक काळ चालली होती. “
-मानसिंग खोचे, प्रभारी पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे

Related Stories

सहकारी,साखर कारखान्यांची आज साखर आयुक्तांसह बैठक

Archana Banage

जिल्हा परिषद विषय समितीमधील रिक्त पदांसाठी उद्या निवडणूक

Archana Banage

कोल्हापूर : आईचा खून करुन काळीज खाणाऱ्या विकृतास मरेपर्यंत फाशी

Archana Banage

KOLHAPUR; जुळत आलेल्या मनात पुन्हा ‘निष्ठावंत’ वादावरून ठिणगी, राजेश क्षीरसागर-संजय पवार पुन्हा आमने-सामने

Rahul Gadkar

ऊस तोडणी ठेकेदाराकडून ८ लाख ६० हजारांची फसवणूक

Archana Banage

किरीट सोमय्यांना ‘नो एंट्री’ म्हणणाऱ्या ‘त्या’ शहराने निर्णय बदला

Archana Banage