कोवाड / वार्ताहर
चंदगड तालुक्यातील कोवाड माणगांव रस्त्यावर म्हाळेवाडी शिवनगे दरम्यान अज्ञात दोघा व्यक्तींनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास लोखंडी टॉमी ने पायावर बेदम मारहाण करून पोबारा केला. त्यानंतर ट्रॅक्टर चालकास रस्त्यावर तब्बल तासभर विव्हळत पडला होता. नवनाथ त्रंबक सूर्यवंशी वय-30 ( मूळ रा. नांदेड जिल्हा) असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. या घटनेने म्हाळेवाडी परीसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नवनाथ त्रंबक सूर्यवंशी हा युवक दौलत साखर कारखाना कडून ऊस खाली करून कोवाड कडे रिकामे ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन येत होता. सायंकाळी साडेचार च्या सुमारास म्हाळेवाडी जवळ येताच दुचाकी आडवी लावून नवनाथ याला रस्त्यावर आडवं पाडून डाव्या पायावर लोखंडी टॉमीने जोरदारपणे मारहाण करून पोबारा केला. मारहाण करणारे युवक हे वाळू च्या ट्रकचे चालक आहेत. शिवणगे गावात वाळूचा ट्रक थांबवून दुचाकी घेऊन या ट्रॅकटर चालकाला त्यांनी अडविले. या मारहाणी बाबत चे मागचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र बाहेरून आलेल्या गरिब ट्रॅकटर चालकाला मारहाणीने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. जखमी नवनाथ याला कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंबुलन्स ने गडहिंग्लज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.


previous post