Tarun Bharat

कोल्हापूर : अलायन्स एअरची हैदराबाद-कोल्हापूर विमानसेवा अखंडित सुरू

गोकुळ शिरगाव / वार्ताहर

सोमवारपासून सुरू झालेली विमानसेवा आजही अलायन्स एअरचे हैदराबाद-कोल्हापूर विमान आल्याने अखंडपणे सुरू राहिली. या विमानसेवेसाठी कोल्हापूरकरांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. हैदराबादहुन कोल्हापूरसाठी दहा प्रवासी आले होते. त्यापैकी 2 सांगली व 1 सांगोला या परजिल्ह्यातील असल्याने या प्रवाशांना प्रशासनाच्यावतीने ज्या त्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सोडण्यात आले. तर कोल्हापुरातील प्रवाशांना के. एम. टी. ने डी. वाय. पाटील हॉस्पिटलकडे पाठवण्यात आले. विमानाने आलेल्या सर्व प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या कोल्हापूर विमान सेवेचे तिकीट बुकिंग सध्या ऑनलाईन पद्धतीने चालू असून तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विमानतळ प्राधिकरणचे संचालक कमल कुमार कटारिया यांनी यावेळी सांगितले.

तसेच काही प्रवाशांनी विमानतळावर करण्यात येणाऱ्या कागदी कारवाई व विलगीकरणाच्या किचकट प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली. आजच्या प्रवाशांमध्ये 100 हून अधिक ताप असणारे कुणीही प्रवासी आढळून न आल्याने बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना विमानात प्रवेश मिळाला. तर सर्व प्रवाशांनी संस्थात्मक विलगीकरण ऐवजी होम क्वारंटाईन करावे अशी आग्रही मागणी केली. दरम्यान आजही विमानतळावर प्राधिकरण पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना संसर्गापासून बचावासाठी खबरदारीचे उपाय काटेकोरपणे अंमलात आणले जात होते.

Related Stories

Buldhana Crime : मुले चोरणारी महिला समजून तृतीयपंथियाला जमावाकडून मारहाण

Archana Banage

आकाशात 22 हजार फुटांवर फडकला तिरंगा

Patil_p

मॅरेथॉनच्या चळवळीच्या सर्व पैलुंवर प्रकाश टाकणारे पुस्तक

Patil_p

पदोन्नतीसाठी विज्ञान शिक्षकांची शुक्रवारी धरणे

Archana Banage

ट्रोलिंग राजकारणाची रेंज गावकुसापर्यंत

Kalyani Amanagi

कोल्हापूर : वळीवडेत गावठी दारूसाठा जप्त; तरुणावर गुन्हा

Archana Banage