Tarun Bharat

कोल्हापूर : अल्पवयीन युवतीवरील अत्याचार प्रकरणी एकास तीन वर्षे सक्तमजुरी

पुलाची शिरोली / वार्ताहर

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नागाव मधील आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. हणमंता भिमसी धोत्रे ( वय २७, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, नागाव, ता. हातकणंगले, जि . कोल्हापूर ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सह जिल्हा न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश, कोल्हापूर यांनी आरोपीस दोषी ठरवून कलम ४५२ खाली दोन वर्षे सक्तमजूरी व ५ हजार रुपये दंड, कलम ३२३ खाली एक वर्ष सक्तमजूरी व १ हजार रुपये दंड, ५०४ खाली एक वर्ष सक्तमजूरी व ५ हजार रुपये दंड, तसेच लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ व कलम ३५४ प्रमाणे तीन वर्ष सक्तमजूरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड अमिता ए. कुलकर्णी विशेष सरकारी वकील, कोल्हापूर यांनी काम पाहीले.

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन महीला पोलीस उपनिरीक्षक एम. टी. गभाले यांनी याप्रकरणाचा तपास केला होता.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : सदर गुन्हा शिरोली एमआयडीसी या पोलीस ठाणेचे हद्दीत ३१ जुलै २०१७ रोजी सायंकाळी घडला आहे. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी ही तिच्या मैत्रीणी सोबत राहत्या घरात एकत्र अभ्यास करीत असताना तिला अचानक दरवाजा वाजविलेचा आवाज आला. त्यामुळे पिडीतेने खिडकीतून डोकावून पाहीले. त्यावेळी तिथे कोणीही नव्हते. दरम्यान अचानक यातील आरोपी याने घराचा दरवाजा ढकलून घरात घूसला व त्याने आतील लाईट व फॅन बंद केले.

पिडीत मुलीचा हात पकडून तिला आत ओढत नेत असताना यातील फिर्यादी पिडीत मुलीने शेजारी टेबलावरील कुलूप त्याच्या डोक्यात मारले व त्याला ढकलून घराला बाहेरुन कुलूप लावून मैत्रिणीसोबत पिडीत मुलगी आईला बोलविण्या करीता आजी आजोबांच्या घराकडे गेली. आई घरी आलेनंतर त्याला घरी येण्याचे कारण विचारताच धोत्रेने मुलीच्या आईला शिवीगाळ करुन तिच्या थोबाडीत मारली. या कारणावरुन आरोपीविरुध्द यातील पिडीतेने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेत फिर्याद दाखल केली होती.

Related Stories

आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचे उद्या कोल्हापुरात जल्लोष स्वागत

Archana Banage

सांगली : बापाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलगा व सुनेवर गुन्हा दाखल

Archana Banage

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय व्होकेशनल योजनेचे सक्षमीकरण करा

Archana Banage

अखेर कोल्हापुरातून टेकऑफ…

Archana Banage

स्वॅब देण्यासाठी ‘त्या’ युवतीची २८ तास प्रतीक्षा

Archana Banage

जनावरांची सृष्टी पांजरपोळ हाऊसफुल्ल

Archana Banage