Tarun Bharat

कोल्हापूर : अश्‍विनी कणेकर गेट परीक्षेमध्ये देशात पहिली

Advertisements


इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथीलडीकेटीईमधील बी. टेक. टेक्स्टाईल केमिस्ट्रीची विद्यार्थिंनी अश्‍विनी कणेकर ही गेट परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक १ (अ.ख.ठ.-१) क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.  पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये गेटमध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवलेली डीकेटीईची विद्यार्थीनी अश्‍विनी कणेकर ही एकमेव आहे. 

 यावर्षी डिकेटीईतील तब्बल ३६ विद्यार्थी गेटमध्ये उत्तम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. गेटमध्ये उत्तीर्ण होण्याची डीकेटीईच्या यशाची परंपरा कायम आहे. डिकेटीईमध्ये गेटच्या तयारीसाठी गेली १० वर्षे खास प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहेत आणि  विद्यार्थ्यांच्या तयारीकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळेच या तयारीचा खूप उपयोग होतो अशी भावना यावेळी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली.    

गेट (ग्रॅज्युएट अ‍ॅप्टीटयूट टेस्ट इन इंजिनिअरींग) ही परीक्षा आय.आय.टी. यांच्यामार्फत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी राबविली जाते.  या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे अ‍ॅनालिटीकल थिंकींग, टेक्निकल नॉलेज व रिसर्च ओरिएंटेड स्किल्स याची चाचणी होते.  एकंदरीतच विद्यार्थ्यांचे बौध्दिक कौशल्य तपासले जाते.  ज्या विद्यार्थ्यांना बी.टेक. नंतर पदव्युत्तर शिक्षण नामांकीत संस्थेमधून घ्यावयाचे आहे. त्यांनी गेट परिक्षेत चांगल्या श्रेणीने उत्तीर्ण होणे हे महत्वाचे आहे. गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आणि पब्लिक सेक्टर क्षेत्रात गेट परीक्षा प्राप्त विद्यार्थ्यांना नोकरीसाठी प्रथम प्राधान्य दिले जाते.

यावर्षी एकूण ७.५ लाख इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा दिली व केवळ १८ टक्के म्हणजेच एकूण १.३५ लाख विद्यार्थी पात्र ठरले व त्यामध्ये टेक्स्टाईल विभागातून अश्‍विनीने देशात प्रथम क्रमांक पटकवला. तीचे सर्व स्तरावर यशामुळे कौतुक होत आहे.  आय.आय.टी. मुंबईचे गेट एक्झाम को-ऑर्डिनेटर यांनी देखील तिचे भ्रमणध्वनीव्दारे अभिनंदन केले.    

पदव्युत्तर शिक्षण घेवून पीएच.डी. चे शिक्षण पूर्ण करणे आणि संशोधक म्हणून करिअर करणे असा अश्‍विनीचा मानस आहे. विद्यार्थिनीस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष, आमदार प्रकाश आवाडे, आर.व्ही. केतकर, डॉ. सपना आवाडे यांच्यासवे सर्व विश्‍वस्त, डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, प्रा.डॉ.यु.जे. पाटील, प्रा.डॉ.एस.बी. व्हनबटटे, या सर्वांचे मार्गदर्शन मिळाले.

Related Stories

अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट ; दिला ‘हा’ सल्ला

Archana Banage

कोरोना टेस्ट : भारत-इस्रायलचे एकत्रित संशोधन

datta jadhav

बीड शेड येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समितीकडून रास्ता रोको

Archana Banage

कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात पूर्ण लॅाकडाऊन?;आज निर्णयाची शक्यता

Archana Banage

संसदेचे पावसाळी अधिवेशन ‘या’ तारखेपासून होणार सुरु

Archana Banage

पतीसह दोन मुलांना विष घालून मारण्याचा प्रयत्न

Archana Banage
error: Content is protected !!