Tarun Bharat

कोल्हापूर : आपट्याच्या पानावर साकारले श्री अंबाबाईचे चित्र

प्रतिनिधी / पेठ वडगाव

नवरात्रोत्सव व विजया दशमी दसऱ्याच्या निमित्ताने सर्वत्र भक्तिमय वातावरणात सुरु असलेल्या विविध धार्मिक वातावरणात भादोले (ता.हातकणंगले) येथील कला शिक्षक संतोष बबनराव कांबळे यांनी आपट्याच्या पानावर कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे चित्र साकारून आपला भक्तीभाव साकारला आहे.

भादोले येथील कलाध्यापक संतोष कांबळे यांनी एकाग्रता व तन्मयतेनेने त्यांनी हे चित्र साकारले आहे. कलाध्यापक कांबळे यांनी आजवर अनेक देवदेवता, राष्ट्रपुरुष, आदिमानव, अखंड साखळी, पेन, मोबाईलसारख्या वस्तूबरोबर अनेक शिल्परचना साबणात साकारल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, राम, लक्ष्मण, सीता, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, स्वामी समर्थ, श्रीकृष्ण अशा अनेक शिल्पकृती त्यांनी साबण व खडूमध्ये साकारल्या आहेत.

यापूर्वी त्यांनी आपट्याच्या पानावर देवीच्या साडेतीन शक्तीपीठासह सात देवतांची कलाकृती साकारली आहे. कला विषयात आर्ट मास्टर पदवी संपादन केलेल्या संतोष कांबळे यांच्या मुलाखती झी चोवीस तास, ई टीव्ही. वाहिन्यावर प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी आजवर चित्रकला क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पारितोषिके मिळवून दिली आहेत. साबण, खडू यात देवदेवतांच्या कलाकृती साकारणारे नाविन्यपूर्ण कलाकुसरीची झालर देणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख असून त्यांना अनेक संस्थांचे पुरस्कारही मिळाले आहेत.

Related Stories

इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांची तडकाफडकी बदली

Archana Banage

बँक योजनांसाठी जिल्ह्यातील बँकांचा मेळावा

Archana Banage

‘मातोश्री’च्या नादाला लागू नका

Archana Banage

खासगी क्षेत्रात रोजगारांच्या संधी

Archana Banage

कोल्हापूर : आंबा परिसराचा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करणार : खासदार माने

Archana Banage

पाटगाव परिसरात विक्रमी पावसाची नोंद

Archana Banage
error: Content is protected !!