Tarun Bharat

कोल्हापूर : आभार फाटा ते शाहूनगर रस्ता तात्काळ दुरुस्त करावा

इंदिरा रिक्षा चालक संघटनेची आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे मागणी
चंदूर / वार्ताहर

चंदुर येथील आभार फाटा ते शाहूनगर दरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्ता खराब झाला असून अनेक अपघात या खड्ड्यांमुळे घडत आहेत. दररोज वाहतूक करणारे व रिक्षा वरती उपजीविका असणारे अनेक रिक्षाचालक सदर रस्त्यावरून प्रवासी वाहतूक करतात. त्यांना या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागत आहे. यामुळे या रस्त्याची आमदार फंडातून तात्काळ दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी इंदिरा ऑटो रिक्षा युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन मागणी केली आहे. यावर प्रकाश आवाडे यांनी लवकरच रस्त्याचे काम पूर्णत्वास नेऊ असे आश्वासन दिले आहे.

Related Stories

कोल्हापूर : शियेत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या नऊ वर

Archana Banage

‘प्रकल्प नको आणि पाणी’ही नको…

Archana Banage

गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये औषध कंपनीत चोरी; १९ लाखांचा माल लंपास

Abhijeet Khandekar

कुरुंदवाड मधील शिवाजी पुतळ्याजवळ रास्ता रोको आंदोलन

Archana Banage

यशवंत इंग्लिश अकॅडमीत पत्रकार दिन उत्साहात

Archana Banage

कोल्हापूर : सकल मराठा समाजाचा उद्या ताराराणी चौकात रास्तारोको

Archana Banage