Tarun Bharat

कोल्हापूर : इचलकरंजीच्या माजी उपनगराध्यक्षाला उघड्यावर लघुशंका केल्याप्रकरणी दंड

इचलकरंजी नगरपालिकेच्या घनकचरा विभागाची कारवाई
‘त्या’ माजी उपनगराध्याचा
लघूशंका करतानाचा फोटो व दंडाची पावती सोशल मिडियावर व्हायरल

राजेंद्र होळकर / इचलकरंजी

सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंका केल्याप्रकरणी इचलकरंजी नगरपालिकेच्या एका बड्या माजी उपनगराध्यक्षाला नगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगेठाथ पकडून ‘ ऑन दी स्पॉट’ दोनशे रुपयाचा दंड वसूल केला. तसेच उघड्यावर लघूशंका करणाऱ्या त्या माजी उपनगराध्यक्षाचा फोटो व दंडाची पावती सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या या कारवाईची सामान्य नागरीकांच्यातून स्वागत करीत, चर्चा केली जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, उघड्यावर लघूशंका करणे किंवा उघड्यावर शौच करणाऱ्या प्रवृतीला आळा घालण्यासाठी घनकचरा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थाना दंड करण्याचा अधिकार राज्याच्या नगरविकास विभागाने संपूर्ण राज्यातील महानगरपालिका, नगपालिका यांना दिला आहे.

या आदेशाची इचलकरजी नगरपालिकेकडून अंमलबजावणी सुरु केली आहे. सोमवारी सकाळी शहरातील सार्वजानिक ठिकाणी नगरपालिकेचा एक बडा माजी उपनगराध्यक्ष उघड्यावर लघुशंका करीत होता. हा गंभीर प्रकार नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आला. त्यांनी ‘त्या’ माजी उपनगराध्यक्षाला रंगेहाथ पकडले. त्याला याप्रकरणी दोनशे रुपयांचा दंड ठोठावून तो वसूल देखील केला.

Related Stories

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्‍यातील १४ ग्रामपंचायतीत महिलाराज

Archana Banage

ऑनलाइन शाळा ॲप राज्यभर वापरण्याचा विचार

Archana Banage

कोल्हापुरात शिवसेना- वंचित युतीचे पालकमंत्री चलेजाव आंदोलन..

Abhijeet Khandekar

अखेर शैक्षणिक घंटा वाजू लागली

Archana Banage

कोल्हापूर : शिरोळ येथे एका घरातील तिघांचा मृत्यू

Archana Banage

शेतकरी संघाच्या `ब्रँड’ चा विस्तार

Archana Banage