Tarun Bharat

कोल्हापूर : इचलकरंजीतील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने रिक्षाने ठोकली धूम

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

इचलकरंजी येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र या रुग्णाने आज दुपारी अचानक रुग्णालयातून धूम ठोकली आहे. आश्चर्य म्हणजे हा रुग्ण चक्क रिक्षाने पळाला. हा रूग्ण अचानकच कुडचे मळा परिसरातील घरात आला आणि नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांची एकच भांबेरी उडाली. याप्रकारानंतर रुग्णालय परिसरातील सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

इचलकरंजीतील कुडचे मळा परिसरात राहणारा हा 55 वर्षाचा नागरिक यंत्रमाग कामगार आहे. त्याने अनेक ठिकाणी यंत्रमागावरही काम केले आहे. त्याचसोबत घरातील 9 व्यक्ती एकत्र राहतात. यामुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आज सकाळी इचलकरंजी परिसरात दोन नवे रूग्ण सापडल्याने शहरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाला ही माहिती समजताच तातडीने त्या भागात अधिकारी दाखल झाले आहेत.

Related Stories

सातारा शहरात रेल्वे रिझर्वेशन-बुकींग सेंटर सुरु

Patil_p

कोल्हापूर बाजार समितीवर प्रशासक

Archana Banage

राजर्षींच्या वास्तूंना टुरिझम हब करण्याची गरज

Archana Banage

कोल्हापूर शहर पूरबाधित भागात बहुतांश `एटीएम’ बंदच

Archana Banage

बार्शीत शुक्रवारी आढळले १९ रुग्ण, एकूण संख्या १४०

Archana Banage

विद्यार्थ्यांना कोरोना चाचणीची नाही सक्ती, ताप, थंडीची फक्त तपासणी

Patil_p
error: Content is protected !!