प्रतिनिधी / इचलकरंजी
शहरातील षटकोण चौकातील बाळनगरमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये 12 जणाना अटक करीत, त्याच्याकडून 5 मोटारसायकल, 8 मोबाईल व 13 हजार 500 रूपयांच्या रोकडसह 2 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाने केली. या कारवाईमध्ये कॉन्स्टेबल सुनील पाटील, सागर हारगुले, जावेद आंबेकारी, सदाम शेख आदींनी भाग घेतला.


previous post