Tarun Bharat

कोल्हापूर : ई-पास आता पोलीस प्रशासनाकडून

–  लग्न, मृत्यू किंवा वैद्यकीय कारणांसाठीच मिळणार ई पास – ऑनलाईन करावा लागणार अर्ज

प्रतिनिधी / कोल्हापूर

आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने ई पास सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. घरातील व्यक्तिचा मृत्यू, लग्नसोहळा, किंवा वैद्यकीय मदतीसाठीच यंदा हा ई पास देण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी परजिह्यात प्रवासासाठी ई पासची आवश्यकता नसणार आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने जिह्याबाहेर प्रवासास बंदी घातली आहे. सबळ कारणाशिवाय परजिह्यात प्रवासास परवानगी देण्यात येणार नाही आहे. गतवर्षी लॉकडाउनच्या काळात जिल्हा प्रशासनाने ई – पास सुविधा उपलब्ध करुन दिली होती. जिल्हा प्रशासनाच्या वतीने हे पास ऍप्रुव केले जात होते. यंदा मात्र पोलीस प्रशासनाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी पोलीस मुख्यालयामध्ये एक स्वतंत्र्य यंत्रणा उभी करण्यात आली आहे. पाससाठी अर्ज केल्यानंतर 24 तासामध्ये हा अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्यात येणार आहे.

पाससाठी असा करा अर्ज

– ई पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम, https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

– त्यानंतर इथं ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करा

– पुढे तुम्हाला ज्या जिह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडा.

– आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

– प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं.

– कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.

– अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. त्या आधारे अर्जाची सद्यस्थिती जाणून घेवू शकता

– पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी नंतरच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता.

– या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोडचा समावेश असणार आहे.

– प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत, त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.

पाससंदर्भातील काही महत्वाचे मुद्दे

– घरातील व्यक्तिचा विवाहसोहळा, घरातील व्यक्तिचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणासाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.

– अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱयासाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.

– अत्यावश्यक सेवा जसे कि बँक, एटीएम, किराणा दुकान, भाजीपाला यांना  शहरांतर्गत परवानगी दिली आहे. त्यांना ई – पासची परवानगी लागणार नाही.

–  कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.

तर नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करा

ई पास साठी ज्या व्यक्तिंना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे शक्य होणार नाही. त्यांनी  नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. तेथील गोपनीय विभागाच्या वतीने नागरीकांना मदत करण्यात येणार आहे.

यंदा पोलीस प्रशासनाच्या वतीने ई पास सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नजीकच्या नातेवाईकाचा मृत्यू, नजीकच्या नातेवाईकाचे लग्न, किंवा वैद्यकीय कारणांसाठीच ई पास देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

Related Stories

‘रासप’च्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 17 जणांचा मृत्यू, 797 नवे रुग्ण

Archana Banage

सीमाप्रश्नी आता २३ नोव्हेंबरला सुनावणी

Abhijeet Khandekar

Kolhapur; जिल्ह्यात शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

Kalyani Amanagi

स्वच्छतेची शपथ घेवून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ

Archana Banage

कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून सुरु ; 45 प्रवासी तिरुपतीसाठी रवाना

Archana Banage
error: Content is protected !!