Tarun Bharat

कोल्हापूर : उचगाव येथे आणखीन एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Advertisements

उचगावात कोरोना पॉझिटिव्हची संख्या झाली चार

प्रतिनिधी / उचगाव

उचगाव (ता.करवीर) पूर्व भागात कोल्हापूर हुपरी रस्त्यावर लकी हॉलशेजारी कदममळा येथे चंदगडहून मुलगीकडे राहण्यास आलेल्या ६८ वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. उचगाव कदममळा परिसर सील करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी उचगांवात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे.त्यामुळे उचगावात कोरोना पॉझिटिव्ह संख्या चार झाली आहे

५ जुलै रोजी चंदगढ येथून हा वृद्ध उचगांव कदममळा येथे मुलगीकडे राहण्यास आला. त्यानंतर दि. १२ रोजी ताप, श्वसनाचा त्रास अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांचा सीपीआर रुग्णालय येथे स्वॅब घेण्यात आला. मंगळवारी सकाळी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उचगांवात खळबळ उडाली. या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईक व इतर व्यक्तींना सीपीआरमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले आहे. उचगावात सोमवारी एक तर मंगळवारी दुसरा रुग्ण सापडला आहे. तर मणेरमळा मोळे कॉलनी येथील पती-पत्नी इचलकरंजी येथे कार्यक्रमांनिमित्त गेले असता ते कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे उचगावात कोरोना पॉझिटिव्ह संख्या चार झाली आहे.

उचगाव कदममळा परिसरात रस्ता बॅरिकेट लावून ग्रामपंचायतीने बंद केला आहे. तसेच सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. सरपंच मालुताई काळे, गणेश काळे, उपसरपंच मनीषा गाताडे, तलाठी महेश सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी अजित राणे, पोलिस पाटील स्वप्निल साठे, ग्रामपंचायत सदस्य जयॕश्री संदिप पाटील, घोडके मँडम, रवी काळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी परिसर सील केला.

Related Stories

अनिल देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे ट्विटच्या माध्यमातून केली ‘ही’ मागणी

Abhijeet Shinde

गायरान जमिनीच्या हद्दीच निश्चित नाहीत, तर अतिक्रमण हटवायचे कसे?

Abhijeet Shinde

पोलिस बंदोबस्त देवूनही अतिक्रमण हटावला मिळेना मुहूर्त

Patil_p

उसाच्या शेताला लागलेल्या आगीत २० एकर ऊस जळून खाक

Abhijeet Shinde

टेंम्पोच्या धडकेत सोनगेतील तरुण ठार

Sumit Tambekar

ध्वनी प्रदूषण कमी झाले, वायू प्रदूषणाचे काय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!