Tarun Bharat

कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

शनिवारी उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्ष लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उतरणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत असणारा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या उमेदवाराची शनिवारी होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे अकस्मिक निधन झाल्याने कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी होणाऱया पोटनिवडणुकीसाठी काँग्रेससह शिवसेनाही आग्रही होती. काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये 2019 मध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या धोरणानुसार ही जागा काँग्रेसला देण्यात यावी, अशी आग्रही भूमिका घेतली होती. तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा हक्क सांगितला होता. शिवसेनेच्या खासदार, आमदारांसह स्थानिक पदाधिकाऱयांनीही हीच भूमिका घेतली होती. पण शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता काँग्रेस लढणार आहे, स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस-भाजप यांच्यात प्रमुख लढत
शिवसेनेच्या माघारीनंतर काँग्रेसचा मार्ग सुकर झाला आहे. काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांचे नाव निश्चित आहे. भाजपने सत्यजीत कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत प्रमुख लढत होणार आहे.

Related Stories

ताडदेव परिसरातील 20 मजली इमारतीला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

datta jadhav

मला सत्तेची आणि खुर्चीची लालसा नाही: पंकजा मुंडे

Archana Banage

‘अजिंक्यतारा’ कोण सर करणार

datta jadhav

लॉकडाऊनमध्ये पालिका निवडणूकीसाठी इच्छूकांकडून साखर पेरणी

Patil_p

Kolhapur : सीमावादाच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीची बैठक

Abhijeet Khandekar

कराडात मुदतबाह्य हॅण्डवॉशचा मोठा साठा जप्त

Archana Banage