Tarun Bharat

कोल्हापूर : उत्तर कार्याचा खर्च टाळून केला कोरोना योध्दांचा सत्कार

कौलगेतील माने कुटूंबियांचा स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी / सेनापती कापशी 

कौलगे ता. कागल येथील हनमंत माने यांच्या आई व माजी सरपंच सौ. संगिता हनमंत माने यांच्या सासुबाई श्रीमती रत्नप्रभा दिनकर माने यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या उत्तर कार्याच्या खर्चाला फाटा देत माने कुटूंबियांनी कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला. 

    हणमंत माने हे एका गटाचे प्रमुख शिलेदार असले तरी त्यांची ओळख ही सामाजिक कार्यासाठी जादा आहे. म्हणून तर त्यांनी आपल्या आईंच्या उत्तरकार्याचा खर्च टाळून एक स्तुत्य उपक्रम राबविला. गेले चार महिने कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आले. या संकटापासुन आपले गाव सुरक्षित रहावे म्हणून जीवावर उदार होऊन आपल्या गावचे सरक्षण करणारे कोरोना योध्दे खरंतर हे पडद्यामागचे हिरो आहेत. पण बहुतांशवेळी या योध्दांचे कार्य बऱ्याच वेळा दुर्लक्षित होते. या सर्व गोष्टींचे समाजभान जपत समाज कार्याचा वसा जपणाऱ्या हनमंत माने यांच्या नजरेतून गोष्ट सुटली नाही. आपल्या आईच्या हळव्या स्मृती जपताना एक उपक्रम राबविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 

त्यानुसार कोरोनाच्या या संकट काळात ज्या ज्या कोरोना योध्दांनी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली यामध्ये प्रामुख्याने सौ. विमल भगत (आरोग्य सेविका), डॉ. अमिर हमजा नदाफ, डॉ. शेख मुजावर आवटे, सौ. रांगिणी संजय कांबळे (पोलिस पाटील), सौ. शोभा सदाशिव माने (आशा), सौ. शितल प्रकाश पाटील, सौ. सुरेखा नंदकुमार पाटील, श्रीमती मालुताई आनंदा पुगावकर  (अंगणवाडी सेविका ), श्रीमती भारती विजय पाटील, सौ. मनिषा नेताजी जाधव, सौ. संजिवनी दत्ताञय चव्हाण, सौ. पुष्पा दत्ताञय खराडे, सौ. वैशाली विजय वरुटे, सौ. बेबीताई दार्जिलिंग पोतदार यांचा समावेश आहे. आयुष्यभर समाजसेवेचा अंखड वारसा वाहिलेले जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा, जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ, सुधा मुर्ती यांची पुस्तके व श्रीमती रत्नप्रभा माने स्मृतीचिन्ह भेट म्हणुण दिली. उत्तरकार्याचा खर्च टाळताना माने कुटुंबियांकडून  राबविलेला हा उपक्रम समाजाला प्रेरणादायी असाच ठरला यांचे कौलगे ग्रामस्थांकडुन स्वागत करण्यात आले. 

Related Stories

घटनापीठाकडे स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करा; मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सरकारला आवाहन

Archana Banage

राज्यपालांच्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? संभाजीराजे

Archana Banage

स्वप्नील लोणकरच्या रूपाने महाराष्ट्र एका उद्योन्मुख अधिकाऱ्यास मुकला – समरजितसिंह घाटगे

Archana Banage

कोल्हापूर : हेर्ले येथील आठ दिवसांपूर्वी मुजवलेले खड्डे पूर्ववत

Archana Banage

मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

Archana Banage