Tarun Bharat

सोलापूर : उपरी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू


वार्ताहर / पंढरपूर:


माॅर्निग वाॅक करत असताना एका वृध्दाला पाठीमागून भरधाव वेगाने येणा-या ऊसाच्या रिकाम्या ट्रॅक्टरने जोरात धडक दिली.यामध्ये तुकाराम नागणे (वय 75 रा.उपरी,ता.पंढरपूर) या वृध्दाचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात आज सकाळी सहा वाजणेच्या सुमारास पंढरपूर – सातारा राष्ट्रीय महामार्गावरील उपरी गावाजवळच्या नागणेवाडी परिसरात घडला.


याबाबतची माहिती अशी की, उपरी येथील तुकाराम नागणे हे आज सकाळी घरा पासून जवळच असलेल्या महामार्गालगत माॅर्निग वाॅकला गेले होते. माॅर्निग वाॅक करत असताना भाळवणीकडून पंढरपूरकडे भरधाव वेगाने जाणा-या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यु झाला.


अपघातानंतर चालकाने ट्रॅक्टरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जवळच्या असलेल्या तरूणांनी मोटारसायकल वरून पाठलाग करून दोन किलीमीटर अंतरावर ट्रॅक्टर थांबवला. त्यावेळी ट्रॅक्टर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले.


पंढरपूर येथील पूजा ज्वेलर्सचे मालक सुभाष नागणे यांचे ते वडील होत. त्याच्या पश्चात तीन विवाहीत मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.

Related Stories

भाजपकडून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचे षडयंत्र: मंत्री मुश्रीफ

Archana Banage

मुलाचे भांडण सोडवताना धक्काबुक्कीत वृद्धाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

शंभर कोटी अब्रुनुकसान प्रकरण : चंद्रकांत पाटील यांचा अर्ज न्यायालयाकडून नामंजूर

Abhijeet Khandekar

सावर्डे बुद्रुक माजी सैनिकाच्या खुनाशी मांडूळ विक्रीचा संबंध नाही

Abhijeet Khandekar

अटक करा पण मिरवणूक निघणारच

Abhijeet Khandekar

जिल्ह्यात तीन रुग्णांची भर

Archana Banage