प्रतिनिधी/सांगरुळ
उपवडे (ता. करवीर) येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ओंकार बाळू पाटील ( वय 20, रा. उपवडे) या युवकाला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना रविवारी (दि.24) रात्री घडली होती.
प्रेम प्रकरणातून एका अल्पवयीन मुलीने विष पिऊन रविवारी (दि.24) रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली होती. याप्रकरणी या मुलीच्या वडिलांनी प्रेम प्रकरणातून आपल्या मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद करवीर पोलिसात दिली होती. काल, सोमवारी रात्री उशिरा करवीर पोलिसांनी उपवडे येथे राहणाऱ्या ओंकार पाटील या युवकाला ताब्यात घेतले होते. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ओंकार याला २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डीवायएसपी प्रशांत अमृतकर आणि पोलीस निरीक्षक सुनील पाटील अधिक तपास करीत आहेत.


previous post