Tarun Bharat

कोल्हापूर : एक हजार`रेमडेसिवीर’ची खरेदी करा – जिल्हाधिकारी

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोना महामारीची दुसरी लाट आल्यापासून जिह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई आहे. सर्वसामान्य रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षांतर्गत रेमडेसिवीरचा पुरवठा सुरु आहे. तरीही खासगीसह सरकारी रुग्णालयांमधील अत्यवस्थ रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी बैठक घेऊन आपत्ती निवारण निधीतून 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अनिल माळी यांना दिले.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अनिल माळी, महानगरपालिका आरोग्य विभाग व अन्न औषध विभागाचे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकाऱयांनी रुग्णालयांकडून दररोज होणारी इंजेक्शनची मागणी आणि पुरवठ्याचा आढावा घेतला. यामध्ये शनिवारी रुग्णालयांकडून 1 हजार 600 इंजेक्शनची मागणी कळवली आहे. मात्र केवळ 250 इंजेक्शन्स उपलब्ध झाले असल्याचे अन्न-औषध विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले.

त्यामुळे इंजेक्शनची टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी आपत्ती निवारण निधीतून तत्काळ 1 हजार इंजेक्शन खरेदी करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिले आहेत. येत्या दोन दिवसात खरेदी प्रक्रिया पूर्ण करून इंजेक्शन उपलब्ध करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात कोरोनाबाधित रुग्णांना पुरेशा प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध होणार आहे.

Related Stories

कोरोचीत शेतकऱ्यांना रान गव्याचे दर्शन

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात रात्री आठ पर्यंत कोरोनाचे 5 बळी, ३०१ पॉझिटिव्ह

Archana Banage

महामंडळ लुटण्यासाठीच अविश्वास ठरावाची खेळी : मेघराज राजेभोसले

Archana Banage

अतिवृष्टीने होणारे भूस्सखलन,पन्हाळ्यास पर्यायी रस्ता,जनावर छावणी उभी करा

Archana Banage

पाच खाजगी सावकारांविरूध्द गुन्हा दाखल

Archana Banage

कोल्हापूर : चोरीप्रकरणी इचलकरंजीतील माजी नगरसेवक पोलिसांच्या रडारवर

Archana Banage
error: Content is protected !!