Tarun Bharat

कोल्हापूर : एखाद्याचा बळी गेल्यानंतरच गतिरोधक बसवणार का?

Advertisements

प्रतिनिधी  / शिरोळ

एखाद्याचा बळी गेल्यानंतरच बांधकाम खाते व संबंधित अधिकारी डोळे उघडणार का असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे. शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार ते जनता हायस्कूल अशा नऊ ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी वारंवार करुनही अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. पद्माराजे विद्यालय तहसीलदार कार्यालय पंचायत समितीमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तींना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओंलाडावा लागतो.

येथील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पद्माराजे विद्यालय, जय भवानी चौक ते महात्मा बसवेश्वर चौक, मटन मार्केट घालवाड फाटा या ठिकाणी प्रचंड वाहनांची कोंडी होत आहे. एकेरी वाहतुकीचा तर बट्ट्या बोळ उडाला आहे. यामुळे बहुतांशी ठिकाणी किरकोळ अपघात व वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. सध्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात सुरू असून ऊस वाहतूक तसेच श्री क्षेत्र नरसेवाडी येथे जाण्यासाठी लांबून भाविक येत असतात शहरातील नऊ ठिकाणी गतिरोधक बसवा म्हणून वारंवार मागणी करण्यात आली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अद्यापि लक्ष घातल्याने एखाद्याचा बळी गेल्यानंतर लक्ष घालणार का असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधितांनी तातडीने यांची दखल घ्यावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला.

Related Stories

अकरावी दुसऱ्या प्रवेश फेरी अखेर 4105 जागा शिल्लक

Abhijeet Shinde

राज्य सरकारने जिल्हा बँकांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवली

Abhijeet Shinde

तरूण भारत इफेक्ट : वारणेच्या जिल्हा सिमेवरील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी परवाना प्राप्त

Abhijeet Shinde

दबावात न राहता जनहिताचे कार्य करा : शौमिका महाडिक

Abhijeet Shinde

आयजीएममध्ये लवकरच बसणार सिटीसस्कॅन मशिन

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 12 बळी, 560 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!