Tarun Bharat

कोल्हापूर : ऐन उन्हाळ्यात दुसऱ्यांदा वारणा नदीची पाणी पातळी खाली

चांदोली धरण फुल्ल… मात्र वारणा नदीतील पाणी गुल

प्रतिनिधी / घुणकी

चांदोली धरण फुल्ल… मात्र वारणा नदीतील पाणी गुल. अस चित्र ऐन उन्हाळ्यात दुसऱ्यांदा वारणा नदीची पाणी पातळी खाली गेल्याने वारणा काठावरील लोकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. वारणा नदीवरील पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेसह शेतीसाठी उपसा करणारे विद्युत मोटार पंप उघडे पडले असुन शेतीचा पाणी पुरवठा ठप्प झाला तर शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी धावधाव करावी लागत आहे.

गेले चार ते पाच दिवस वारणा नदीच्या पात्रातील पाणी पातळी खाली गेल्याने नदीवरील विद्युत मोटर पंप उघडे पडले असुन ऐन मे महिन्यात शेतीचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. मार्च अखेरीस व आता मेच्या पहिल्या आठवड्यात असे दुसऱ्यांदा ऐन उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज असताना वारणा नदीतील पाणी पातळी खालावुन शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या मोटार पंप उघडे पडले असल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.

साहजिकच शेती पाणी पुरवठा लांबल्याने जवळपास पंधरा दिवस पाण्याचा फेर लांबणार आहेत. याचा फटका माळ भागच्या व मोठ्या पाणीपुरवठा योजने खाली असणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे. उत्पादनात घट होण्याची भिती शेतकरी वर्गामधून व्यक्त होत असुन धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठी १७ .२२ टीमसी म्हणजे ५० % असून सुध्दा पाटबंधारे विभागाचे नियोजन अभावी पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांच्यातुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत कोडोली येथील वारणा पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता धरणक्षेत्रा जवळील पंप हाऊसमध्ये दुरस्तीच्या कामासाठी पाणी सोडणे थाबंविण्यात आले होते एक दोन दिवसात पाणी पातळी पुरववंत होईल असे सहाय्यक अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी सांगितले.
धरण क्षेत्रात पाणी साठा असतानाही केवळ पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे वारणा नदी काठावरील नागरिकांना पिण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी टंचाईला सामोरी जावे लागत असल्याने शेतकऱ्यासह जनतेतून संताप व्यक त होत आहे.

Related Stories

शस्त्र परवाना नुतनीकरणाला आता 5 वर्षांची मुदत

Kalyani Amanagi

महापालिका एकहाती राष्ट्रवादीकडे असल्याचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा

Archana Banage

राज्यातील 9 लाख नोंदीत कामगारांना अर्थसहाय्य

Archana Banage

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विसाव्या ऊस परिषदेला उत्साहात प्रारंभ

Archana Banage

लग्न समारंभात परवानगी 25ची; उपस्थिती 300ची

Archana Banage

कोल्हापूर : दारू दुकान समोर दोन गटात तुंबळ हाणामारी

Archana Banage
error: Content is protected !!