Tarun Bharat

कोल्हापूर : ‘ओएलएक्स’च्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक

७० हजार रुपयांची पिशवी हिसकावून अज्ञातांचे पलायन

वार्ताहर / पुलाची शिरोली

जूनी चारचाकी माल वाहतूक गाडी खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची ७० हजार रुपयांची पिशवी हिसकावून अज्ञातांनी पलायन केले. चिंतामणी संजय मडीवाळ वय वर्षे ३१, रा. मजरेवाडी ता. शिरोळ असे लुबाडणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हि घटना सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास पूणे-बंगलूर राष्ट्रीय महामार्गालगत शिये फाटा येथे घडली.

‘ओएलएक्स’ या अॅपवरती अशोक लेलॅन्ड माल वाहतूक ट्रक विक्रीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती.‌ यामध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर मडीवाळ यांनी संपर्क साधला व त्या समीर नावाच्या व्यक्तीने आपण एजंट आहे. तुम्ही गाडी बघण्यासाठी श्रीराम फायनान्स कंपनीच्या शिये फाटा येथील गोडावूनजवळ या असे सांगितले. मडीवाळ शिये फाटा येथे आले तेव्हा तिघेजण वाट बघत थांबलेले होते. त्यातील एकाने खांद्यावर हात ठेवून बोलत बाजूला नेले व सोबत असलेल्या दोघांनी सत्तर हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पल्सर मोटर सायकल वरुन बेंगलोरच्या दिशेने पलायन केले.

या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. फौजदार अतुल लोखंडे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात ४५७ सायबर गुन्हे

datta jadhav

ओबीसी समाजाचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- अजित पवार

Archana Banage

राणी चन्नम्मा एक्स्प्रेस कोल्हापुरातून रद्दच्या हालचाली

Archana Banage

VIDEO>विद्यापीठाच्या अधिसभेत घुसले अभाविपचे विद्यार्थी; कुलगुरू आणि प्रशासनाविरोधात घोषणा

Abhijeet Khandekar

इचलकरंजीत अपघात वृद्ध जखमी

Archana Banage

गोकुळची दूध खरेदी दरात कपात

Archana Banage