Tarun Bharat

कोल्हापूर : करवीरमधील अडीच हजार मिळकत धारकांना दिलासा

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

करवीर प्रांतांकडील चुकून लागलेले ब सत्ताप्रकार क करण्याचे आदेश शनिवारी रात्री उशिरा निघाले, या आदेशामुळे 57 प्रॉपटीकार्डवरील 1 हजार 348 मिळकतधारकांचे 50810.2 चौरस मीटर क्षेत्रफळ मिळून 103 प्रॉपर्टीकार्डवरील 2 हजार 530 मिळकतधारकांचे 6,223.65 चौरस मीटर क्षेत्रावरील ब सत्ताप्रकार कमी करुन ‘क’ केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 17 फेब्रुवारीला कोल्हापूर शहरातील प्रॉपर्टी कार्डवरील चुकून लागलेला ब सत्ताप्रकार कमी करुन क सत्ताप्रकार करण्याबाबत बैठक झाली होती. ज्या प्रॉपर्टीकार्डवर ब सत्ताप्रकार अशी नोंद चुकीने झाली आहे अशांची गैरसोय टाळण्यासाठी मोहीम घेणे, तसेच क ड ई पत्रक, इनाम पत्रक, चौकशी उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा, बॉन्ड बुक उतारा, हुजूर ठराव, असेसमेंटचा उतारा हे न मागता प्रशासकीय पातळीवरच या कागदपत्रांची छाननी करुन प्रॉपर्टी कार्डवर चुकून लागलेला ब सत्ताप्रकार कमी करण्याबाबत जिल्हाधिकाऱयांनी बैठकीत निर्देश दिले होते.

त्यानंतर तहसील आणि नगर भूमापन स्तरावर विशेष पथक नियुक्त केले होते.   पथकाने त्यांच्या स्तरावर 57 प्रॉपर्टीकार्डबाबत छाननी करून 29 जुलै रोजी सिटी सर्व्हेच पथकाने तर तहसील कार्यालयाच्या पथकाने 10 ऑगस्ट 2020 रोजी अहवाल प्रांताधिकाऱयांना सादर केला. कागदपत्रांची तपासणी करुन सिटी सर्व्हे क्रमांकाबाबत पूर्वी ब सत्ताप्रकार ‘क’ करण्याबाबत झालेल्या आदेशांची शहानिशा करून प्रांताधिकाऱयांकडील 14 ऑगस्ट  रोजी सिटी सर्व्हे क्रमांकाबाबत चुकून लागलेले ‘ब सत्ताप्रकार ‘क’ करण्याबाबत आदेश केले आहेत. या आदेशामुळे 57 प्रॉपटी कार्डवरील 1348 मिळकतधारकांना लाभ होणार आहे व या आदेशातील एकूण क्षेत्रफळ 50,810.2 चौरस मीटर एवढे आहे.

यापूर्वी प्रांताधिकाऱयांकडील 12 जून 2020 च्या आदेशाने 46 मिळकत पत्रिकेवरील 1182 मिळकतधारकांचे 35,413.63 चौ.मी. क्षेत्रफळावरील व 14 ऑगस्ट 2020 च्या आदेशाने 57 प्रॉपटी कार्डवरील 1348 मिळकतधारकांचे 50810.2 चौ.मी. क्षेत्रफळ असे मिळून 103 मिळकतपत्रिकेवरील 2530 मिळकतधारकांचे 86,223.65 चौरस मीटर क्षेत्रावरील ब सत्ताप्रकार कमी करुन  क करण्यात आले आहे. संबंधित प्रॉपर्टीकार्ड धारकांनी या आदेशानुसार त्यांच्या मिळकतीचे रुपांतरण शुल्क संबंधित तलाठी किंवा तलाठी कसबा बावडा यांच्याकडे जमा करावे. त्यानंतर नगर भूमापन अधिकारी कार्यालयात या जमा रुपांतरण शुल्काची पावती दिल्यास प्रॉपर्टी कार्डवरील ब सत्ताप्रकार हा कमी करण्यात येईल. यापुढेही ही मोहीम सुरु राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.

Related Stories

‘महापालिका’ की ‘देवस्थान’ यातच तुंबले गटारीचे काम

Kalyani Amanagi

मिल्कोटेस्टरचा पासवर्ड आता ‘गोकुळ’कडे

Archana Banage

उच्च वीज दाबाने वाकरेत घरगुती साहीत्य जळाले, चार लाखांचे नुकसान

Archana Banage

कोल्हापूर : ग्रामीण भागातील पशुपालकांची पशुखाद्याच्या माध्यमातून लूट

Archana Banage

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या व्हीसी सभेवर जनसुराज्यचा आक्षेप

Archana Banage

मासिक पासधारक करणार विशेष रेल्वेने प्रवास

Archana Banage
error: Content is protected !!