Tarun Bharat

कोल्हापूर : करवीर तहसिलदारांची कोगे ग्रामपंचायतीस भेट, मान्सून पूर्व पूरपरिस्थितीचा घेतला आढावा

Advertisements

प्रतिनिधी / कसबा बीड

करवीर तहसीलदार शितल मुळे भांबरे यांनी कोगे (ता. करवीर) गावात मान्सून पूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्रामपंचायतीला भेट दिली. 2019 ला आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक व मानसिक त्रास झाला. पावसाळ्यामध्ये त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. तोच अनुभव पाठीशी घेऊन 2019 ची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आत्तापासूनच नियोजनाबाबत सूचना दिल्या. तसेच त्या कुटुंबांचे गावातील शाळा व सुरक्षित स्थळी हलवण्यास ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी यांच्या उपस्थितीत मान्सून पूर्व पूर परिस्थितीचा आढावा घेतला.

कोगे येथे 2019 ला ज्या ठिकाणी पूर आला होता, तेथील नागरिकांचे अलगीकरण करणे, तसेच जागतिक महामारी असणारा कोरोना या संसर्गजन्य रोगाला रोखण्यासाठी मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने गावातील सर्व डॉक्टर्स यांना 5 दिवसापेक्षा जास्त उपचार चालू असलेल्या पेशंटचे लेखी रिपोर्ट ठेवणे, होम आयसोलेटेड करणे, शासकीय कोविड सेंटर कुडित्रे, शिंगणापूर, कुरुकली, कोल्हापूर या ठिकाणी कोरोना ग्रस्तांना पाठवून देणे, फ्रंटलाईन वर्कर्स यांना सेवेत घेऊन काम करणे, खुपिरे, शिरोली, शिंगणापूर येथे स्वॅब  घेण्यास पाठवून देणे, कोरोना पॉझिटिव पेशंट यांना गाडीतून ग्रामपंचायतने पाठवून देणे, निगेटिव पेशंटचे अलगीकरण शेतातील घरात किंवा वेगळ्या खोलीत करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. 

कोगे गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी समिती व कोरोना दक्ष समिती यांनी आज अखेर केलेल्या कामाचे लेखी नियोजन व केलेले काम याची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये आरोग्य सेवक रवींद्र कोळी, ग्रामसेवक डि.के. आंबेकर, तलाठी पुरुषोत्तम ठाकूर, मंडलाधिकारी प्रवीण माने, पोलीस पाटील दत्तात्रय मिठारी, सरपंच नीलम पाटील,उपसरपंच बाजीराव निकम, कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक पी. के. पाटील, तसेच सर्व सदस्य, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, सुपरवायझर व ग्रामस्थ यांनी मिळून केलेल्या कामाचे कौतुक केले.

Related Stories

सांगली-कोल्हापूर महामार्गावर टेम्पोच्या धडकेत एक ठार

Kalyani Amanagi

कामगार अपंगत्वास कारणीभूत प्रकरणी ‘कणेरी इंडस्ट्रीज’च्या मालकावर गुन्हा दाखल

Archana Banage

दारु पिऊन वाहन चालविल्या प्रकरणी तिघांना शिक्षा

Archana Banage

Kolhapur : ग्रामसेवकाची कोतवालास बघून घेण्याची धमकी; शिरोली ग्रामपंचातमधील प्रकार

Abhijeet Khandekar

जवाहरनगरातील आर. सी. गँगला मोका

Archana Banage

छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या मालकीचे नाहीत, संजय राऊतांचा टोला

Archana Banage
error: Content is protected !!