Tarun Bharat

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघात दहा दिवस ‘जनता कर्फ्यू’

आमदार पी. एन. पाटील यांची माहिती

प्रतिनिधी / कोल्हापूर

करवीर विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी करवीर विधानसभा मतदारसंघात शुक्रवार दिनांक ११ सप्टेंबर ते दिनांक २० सप्टेंबर २०२० असा दहा दिवस जनता कर्फ्यू करण्यात आला असल्याची माहिती आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांनी दिली.

आमदार पी. एन. पाटील सडोलीकर म्हणाले, करवीर विधानसभा मतदारसंघातील करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच जनतेच्या आरोग्याची काळजी वाटत असल्याने करवीर विधानसभा मतदारसंघात जनता कर्फ्यू केला आहे. कोरोना महामारीचे हे संकट कमी करण्यासाठी जनता कर्फ्यू करावा अशी अनेकांची मागणी होती. हा जनता कर्फ्यू आपल्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी, वृद्ध आई- वडिलांसाठी आहे. त्यामुळे सर्वांनी या जनता कर्फ्यूला सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले.

या दहा दिवसांच्या काळात हे राहणार चालू
औषधे दुकाने, दूध संकलन व दूध पुरवठा, शेतकऱ्यांची खते, बी बियाणे कीटकनाशके, शेतीसेवा केंद्रे, सर्व बँकांची एटीएम, सरकारी, निमसरकारी, खाजगी कर्मचारी, अधिकारी, आपली ओळखपत्रे दाखवून जाऊ किंवा येऊ शकतील, दवाखाने व कोव्हीड सेंटर मधील सर्व कर्मचारी यांना परवानगी.

हे राहणार बंद
सर्व दुकाने, रेशन दुकाने, सर्व बँका व पतसंस्था, भाजीपाला खरेदी विक्री, खाजगी वाहने, मोटार सायकली विनाकारण फिरवता येणार नाहीत, गावात परगावच्या वाहनांना बंदी, चौकात किंवा कट्ट्यावर विनाकारण फिरता व बसता येणार नाही.

Related Stories

कोल्हापूर : 1586 नवे कोरोना रुग्ण, तर 33 मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : मराठा आरक्षण स्थगितीवर २७ ऑक्टोबरला फैसला

Archana Banage

Satej Patil हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची- सतेज पाटील

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 7 बळी, 293 पॉझिटिव्ह

Archana Banage

आता निमंत्रण पत्रिका झाली डिजिटल..!

Archana Banage

…नाहीतर समांतर सभा घेणार- शौमिका महाडिकांचा इशारा

Archana Banage