Tarun Bharat

कोल्हापूर : काखे – मांगले पूलाचे काम १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा – आ. विनय कोरे

वारणानगर / प्रतिनिधी

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यास जोडणाऱ्या काखे- मांगले पुलाचे उर्वरीत काम येत्या १५ सप्टेंबर पूर्वी पूर्ण करावे व हा मुख्य पुलाचा रस्ता वाहतुकीस खुला करून द्यावा असे आदेश पन्हाळा -शाहूवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असून यामुळे काखे- मांगले पुलाच्या अंतीम टप्यातील कामास गती मिळणार आहे.

काखे- मांगले या पुलाचे काम आता अंतीम टप्प्यात आहे सुमारे १२ कोटी रुपये यापुलासाठी मंजूर झाले होते. गेल्या काही दिवसापासून या पुलाचे काम रखडले होते.आज सांयकाळी पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार डॉ.विनय कोरे यांनी काखे येथे जावून वारणा नदीवरील काखे-मांगले या मुख्य पुलाच्या कामास भेट देवून पाहणी केली.

सध्या या पुलाचे काम अंतीम टप्यात आहे मांगले गावाकडील पुलाच्या पिलरचे काम सुरू होते परंतू वारणा नदीच्या पात्रात पाणी जास्त असल्याने हे काम थांबले होते या पिलरचे काम किमान पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे तसेच पिलरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाचे अंतीम टप्यातील उर्वरीत सर्व कामे हे १५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून हा पूल रस्ता वाहतूकीसाठी खुला करून देण्याचे आदेश आम.कोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.यावेळी दिपक पाटील, जयसिंग पाटील, संदीप पाटील पोलीस पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

मुंबईत कार्यरत असलेल्या चिंचणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

Archana Banage

‘आयपीएल’साठी कोरोना नियम लागू होत नाही का?’

Archana Banage

बाईक टॅक्सीविरोधात आंदोलन भोवले; पुण्यातील 2500 रिक्षा चालकांवर गुन्हा

datta jadhav

स्विफ्ट कारची झाडाला धडक बसून जवान ठार

Tousif Mujawar

‘गोकुळ’ दुध उत्पादकांच्या मालकीचा करणार : मंत्री हसन मुश्रीफ

Archana Banage

तासगाव कारखाना प्रतिटन २८५० रुपये दर देणार

Archana Banage