Tarun Bharat

कोल्हापूर : किटवाड धबधब्याकडील पर्यटकांची रिघ थांबवावी

कोरोना पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून कारवाईची मागणी

वार्ताहर / कुदनूर

संपूर्ण जगासह देशावर कोरोना महामारीचे संकट ओढाविले असताना वर्षा पर्यटनासाठी मात्र पर्यटक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. चंदगड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला तसेच कर्नाटकच्या सीमेलगत असलेल्या किटवाड धबधब्याकडे परिसरासह कर्नाटकातील पर्यटकांची रिघ सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय उद्धट पर्यटकांमुळे स्थानिक नागरिकांची डोखेदुखी वाढली असून, पर्यटकांच्या गैरवर्तनामुळे त्रस्त झाले आहेत. सद्यस्थिती पाहता प्रशासनाने धबधब्याकडील पर्यटकांची रिघ थांबवून कारवाई करण्याची मागणी व्यक्त होत आहे.

कर्नाटक राज्याच्या सीमेपासून सुमारे ५ किमी अंतरावर असणारा किटवाड धबधबा गेल्या काही वर्षापासून वर्षा पर्यटनासाठी प्रकाशझोतात आला आहे. मुबलक पाऊस झाल्यामुळे किटवाडचा लघू पाटबंधारा तलाव क्रमांक २ पूर्ण क्षमतेने भरून कालकुंद्रीच्या दिशेला ओव्हरप्लो होणार्‍या पाण्यातून हा धबधबा निर्माण झाला आहे. याशिवाय निसर्गाची मुक्तपणे उधळण असणारा हा परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मात्र, सध्या किणी कर्यात भाग कोरोनाच्या विळख्यात अडकला असून, अनेक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे सद्यस्थिती पाहता किटवाड धबधब्याकडे पर्यटकांची वाढती गर्दी टाळणे गरजेचे आहे.

बेळगाव भागातील अधिकांश पर्यटक
याठिकाणी प्रामुख्याने सीमाभागातील तसेच अधिकांश बेळगाव भागातील पर्यटक मोठ्याप्रमाणात दाखल होत आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमांचे पालन पर्यटकांकडून होताना दिसत नाही. याशिवाय काही अतिउत्साही तसेच हुल्लडबाज पर्यटक दारुच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या येथील परिसरात इतरत्र फेकून देत असल्यामुळे धबधब्यासह परिसराचे निसर्ग सौंदर्याला हानी पोहोचत आहे.

पर्यटकांवर बंदी घालावी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सद्याच्या घडीला या परिसरात पर्यटकांवर बंदी घालावी. अर्थ आणि प्रसिद्धीच्या मागे न लागता स्थानिकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन अघडीत घटना घडू नये, अशी मागणी ज्ञान, सेवा, त्याग युवक मंडळाने किटवाड ग्रामपंचायतीकडे केली आहे.

Related Stories

दिव्यांगांनो बोगस ओळखपत्रे घेऊ नका!

Abhijeet Khandekar

एसटी कर्मचारी बेमुदत उपोषण; एकच मागणी, शासनात विलिनीकरण

Archana Banage

कोल्हापूर : गगनबावडा महावितरण कंत्राटी वायरमनचा सर्प दंशाने मृत्यू

Archana Banage

Kolhapur : अडीच लाखांचा गंडा घालून मोपेडसह भाडेकरू पसार; नागाव येथील प्रकार

Abhijeet Khandekar

Kolhapur; उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनेच दिल्लीला- खासदार मंडलिक

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : खोची ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता मोहीम

Archana Banage