Tarun Bharat

कोल्हापूर : कुंभोज आरोग्य पथक अजूनही ‘विनाऑक्सिजन’

आरोग्य पथकात कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्तीच नाही
शासनाने तात्काळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमावा

वार्ताहर / कुंभोज

आकाराने व विस्ताराने जवळजवळ तेवीस हजार लोकसंख्या असणारे कुंभोज ता. हातकणंगले येथील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव आहे परिणामी कुंभोज हा स्वतंत्र जिल्हा परिषद मतदार संघ असून यामध्ये दोन पंचायत समिती मतदारसंघाचा समावेश होतो. परिणामी गेल्या सहा महिन्यात कुंभोज गावाला कोरोनार महामारीमुळे मोठे नुकसान झाले असून 100 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित व दहा रुग्ण मयत झाले आहेत.

तसेच कोरोना बगळता दररोजच्या इतर किरकोळ उपचारासाठीआरोग्य पथकात उपचार घेणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परिणामी गेल्या दोन महिन्यापासून कुंभोज येथील आरोग्य पथकात कायमस्वरूपी डॉक्टरची नियुक्तीच नसल्याने, कुंभोजचे आरोग्य पथक अजूनही विनाऑक्सिजन असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कुंभोज येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्या, तसेच काही कर्मचारी पूर्वसूचना न देता आपल्या पदाचा राजीनामा दिला परिणामी कोरोना संकटाच्या काळात दवाखान्यात डॉक्टर व आवश्यक आरोग्य कर्मचारी वर्ग नसल्याने कुंभोजवर मोठे संकट कोसळले. परिणामी नागरिकांना प्राथमिक उपचारासाठी तारदाळ, हातकलंगले, सावर्डे सारख्या दवाखान्यांचा आधार घ्यावा लागला.

यावेळी आरोग्य पथकातील उपस्थित असणाऱ्या आरोग्य सेवक आरोग्य सेविका यांनी कुंभोज येथे तारेवरची कसरत करत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना ग्रामपंचायत व कोरोना कमिटीचे सहकाय लाभले, परिणामी आकाराने विस्ताराने मोठे असणाऱ्या कुंभोज गावात कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नेमण्याची मागणी बऱ्याच वेळा जिल्हा परिषद कोल्हापूर, आरोग्य विभाग यांच्याकडे करूनही केवळ आश्‍वासनाशिवाय काही मिळाली नाही. परिणामी राजकीय प्रतिनिधी व शासकीय अधिकारी कुंभोज आरोग्य पथकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. काहीवेळा नागरिकांच्यातून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात परिसरातील कोणत्यातरी दवाखान्यातील डॉक्टरांची नेमणूक बदली डॉक्टर म्हणून कुंभोज येथे करण्यात येते. सदर डॉक्टर एक-दोन दिवसांसाठी कुंभोज येथे काम पाहून पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी हजर होतात व पुन्हा कुंभोज येथील आरोग्य पथक डॉक्टरविना पोरके होते.

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांच्याशी चर्चा केली असता कोरोना कालावधीत सरकारी प्राथमिक आरोग्य पथकातील अनेक डॉक्टरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून बऱ्याच डॉक्टरांची नियुक्ती केविड सेंटर येथे करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक डॉक्टरांची पदे रिक्त असून काम करू इच्छिणाऱ्या डॉक्टरांनी जिल्हा परिषदशी संपक साधावा अशीही माहिती त्यांनी दिली.

परिणामी याबाबत कुंभोज जिल्हा परिषद सदस्य व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना विचारले असता आपण वारंवार जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला असून कायमस्वरूपी डॉक्टर देण्याची मागणी केली आहे परिणामी कुंभोज व परिसरातील एमबीबीएस अथवा आरोग्य खात्यातील पदवीधर डॉक्टरांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून कुंभोज येथील कार्यभार सांभाळावा सदर डॉक्टरांची नेमणूक जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येईल असे आव्हान त्यांनी यावेळी केले. परिणामी सदर आव्हानाला परिसरातील कोणत्याही डॉक्टरने प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सध्या ग्रामपंचायत आरोग्य विभाग व कोरोना कमिटीच्या सहकार्यामुळे कुंभोज परिसरातील कोरोना आटोक्यात आणण्यात यश मिळाले असून सध्या ऊस तोडनी कामगार यांचे आगमन मोठ्या प्रमाणात कुंभोज परिसरात होत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार असून बाहेरून येणाऱ्या रुग्णांना व गावातील गरजू रुग्णांना उपचारासाठी कायमस्वरूपी डॉक्टरांची व आरोग्य कर्मचाऱ्यांचे गरज आहे. परिणामी गेल्या काही महिन्यापासून आरोग्य पथकातील डिलिव्हरी मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून, डॉक्टरांचीव आवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांची असणारी कमतरता यामुळे सर्वसामान्य नागरिकाला खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे मोफत होणारा औषध उपचार, शस्त्रक्रिया सध्या मोठ्या प्रमाणात खर्च करून खाजगी दवाखान्यात विकत घ्यावे लागत आहेत. त्यामुळे एका बाजूला कोरोनाचे संकट ,हाताला नसणारे काम व खाजगी दवाखान्यात होणारे दवाखान्याचे बिल यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे.

सदर बाबीचा विचार करून शासनाने कुंभोज आरोग्य पथकात तात्काळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, व कमी असणारा आरोग्य कर्मचाऱ्यांचा स्टाफ नेमावा अशी मागणी कुंभोज ग्रामस्थांतून जोर धरत आहे. परिणामी काही संघटनांनी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे जिल्हा परिषद कोल्हापूर व आरोग्य विभाग हातकणंगले यांना दिला आहे.

Related Stories

शाहूवाडी तालुक्यात गवतास आग लागून सुमारे चार लाखाचे नुकसान

Archana Banage

ट्रकची दुचाकीस जोराची धडक,पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी

Archana Banage

“सत्तेच्या लाचारीसाठी स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवावा हे राणेंकडून शिकावं”

Archana Banage

टाेपमधील त्या रुग्णाच्या संपर्कातील डाॅक्टर पाॅझिटिव्ह

Archana Banage

Kolhapur; पालेश्वर धरणात बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Abhijeet Khandekar

पन्नास वर्षाच्या अनोळखी इसमाचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!