Tarun Bharat

कोल्हापूर : कुंभोज येथे बेकायदेशीर किटकनाशकाचा साठा जप्त

कृषी विभागाची कुंभोजमध्ये मोठी कारवाई, कुंभोजमध्ये प्रतिबंधित फोरेटचा साठा जप्त
सोशल मीडियातून बेकायदेशीर कीटकनाशक विक्री हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल

वार्ताहर / कुंभोज

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे प्रतिबंधित कीटकनाशक विक्रेत्यावर गुन्हा दाखल व्हाट्सअप द्वारे खरेदी-विक्री आली अंगलट, केंद्र शासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फोरेट सारख्या काही घातक कीटकनाशकांवर बंदी घातलेले आहे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून फोरेटची खरेदी विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार विभागीय भरारी पथकाने कुंभोज येथील बापुसो कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून प्रतिबंधित फोरेटचा साठा पकडला, सदर फोरेट वरील उत्पादक कंपनीशंकास्पद असल्याने संशयास्पद फोरेडचा नमुना काढून पुढील चौकशीसाठी पुणे येथे पाठवण्यात आला. तपासणीनंतर सदर फोरेटमध्ये दहा टक्के सपोर्ट घटकांपैकी झिरो टक्के घटक उपलब्ध असल्याचे आढळले.

सदर उत्पादक कंपनी जे डी सी.काँपे सायन्स वापी गुजरात पुरवठादार कंपनी गुजरात किसान फर्टीलायझर कंपनी राजकोट यांनी महाराष्ट्र शासनाच्या कोणताही परवाना घेतला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तंत्र अधिकारी बंडा कुंभार यांच्या फिर्यादीवरुन संबंधित कंपनी व बापुसो कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर मदन लक्ष्मण अनुसे वाठार यांच्यावर हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी समवेत विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील राज्यस्तरीय पथकातील उपसंचालक अशोक बाणवले कीटकनाशक निरीक्षक प्रवीण कदम, बंडा कुंभार प्रल्हाद साळुंके यांनी 187 किलो अप्रमाणित फोरेटची जप्ती केली, पुढील अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत.

फसवणुकीसाठी लढवली मोठी शक्कल

अप्रमाणित फोरेटच्या व्हाट्सअप वरून टॅक्स इंवोईस देऊन पुरवठादार गुजरात किसान फर्टीलायझर कंपनीने दुकानदाराकडून प्रथमत पैसे भरून घेतले तर नंतर व्ही आर एल ट्रान्सपोर्ट मध्ये फोरेटच्या गोण्या पाठवल्या. परंतु डिलिव्हरी स्लिपवर स्प्रे पंप चा उल्लेख केला व सोबत पाठवलेली विक्री बिलावर सेंद्रिय खताचा उल्लेख केला. यावरून संबंधित कंपनीने शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

कृषी अधिकारी यांचे आव्हान

कोणी फेसबुक व व्हाट्सअपच्या भूलथापांना बळी न पडता कायद्याने नोंद व शिफारस केलेल्या किटकनाशकांची खरेदी प्रमाणपत्रधारक कंपनीच्या डीलर कडुन करावी असे आवाहन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी केले.

Related Stories

कोजिमाशी निकाल अपडेट : दादा लाड यांचे सत्ताधारी स्वाभिमानी पॅनेल आघाडीवर

Abhijeet Khandekar

पावनखिंड येथे मद्यधुंद तरुणांची स्थानिकांकडून धुलाई

Archana Banage

दोनवडेनजीक मोटरसायकल अपघातात एक ठार, एक जखमी

Archana Banage

कोल्हापूर : हडलगे येथील 102 वर्षाच्या आजीबाई घरी राहून कोरोनामुक्त

Archana Banage

आष्टा येथे घरगुती गॅस गळतीमुळे स्फोट

Archana Banage

Kolhapur : शिरोळमधील शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटात; मुख्यमंत्र्याची घेतली भेट

Abhijeet Khandekar