Tarun Bharat

कोल्हापूर : कुदनूरच्या शेतकर्‍याचा ताम्रपर्णीत बुडून मृत्यू

पाण्यात पाय घसरून पडल्याने दूर्दैवी अंत

वार्ताहर / कुदनूर

कुदनूर येथील शेतकर्‍याचा ताम्रपर्णी नदीत बुडून मृत्यू झाला. गोपाळ कृष्णा रेडेकर (60) असे दूर्दैवी शेतकर्‍याचे नाव आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली असून, घटनेचा अधिक तपास कोवाड पोलीस करत आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी, गोपाळ रेडेकर हे तळगुळी हद्दीतील मोळीकडील शेतात 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वा. सुमारास गेले होते. मात्र, त्या दिवसापासून ते घरी परतले नाहीत. घरच्यांनी त्यांची शोधा-शोध केली असता त्यांची कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सोमवारी चन्नेटी हद्दीतील कामेवाडी बंधार्‍याला रेडेकरांचा मृतदेह अडकल्याचे काही स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्याबाबतची माहिती कोवाड पोलिसांना देण्यात आली.

कोवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली असता गोपाळ रेडेकरांचा मृतदेह असल्याची खात्री झाली. रेडेकर शेतातील काम आटोपून ताम्रपर्णी नदीत हात-पाय धुन्यासाठी गेले असता पाय घसरून पाण्यात पडले असल्याची वर्दी त्यांचा भाऊ महादेव कृष्णा रेडेकर यांनी पोलिसात दिली आहे. घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पंचनाम्यावेळी कुदनूरचे पो. पाटील नामदेव लोहार, राजगोळीचे पो. पाटील प्रदिप दड्डीकर उपस्थित होते. रेडेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. घटनेचा अधिक तपास कोवाड पोलीस चौकीचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक करत आहेत.

Related Stories

बाप्पा मोरया…कोरोनाला हद्दपार करुया

Archana Banage

खुपिरे राष्ट्रीय पेयजल योजनेचे खासदार मंडलिक यांच्या हस्ते उद्घाटन

Archana Banage

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कारखान्‍यातर्फे गगनबावडा तालुक्‍यासाठी रूग्‍णवाहिकेचे लोकार्पण

Archana Banage

जमिनीसाठी पुतण्याने चुलत्यावर केला चाकूने वार

Kalyani Amanagi

कोल्हापूर जिल्ह्यात आठ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर

Archana Banage

कोकणवासियांसाठी गोकुळचे ताजे दूध

Archana Banage
error: Content is protected !!