Tarun Bharat

कोल्हापूर : कुरुकली येथे भर रस्त्यावर तरुणाचा कोयत्याने खून

भोगावती/प्रतिनिधी :

कुरुकली ता. करवीर येथील शेतात म्हैशी जाऊन नुकसान झाल्याचे रागातून गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास तरूणाचा धारदार हत्याराने निर्घूनपणे खून करण्यात आला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार काशिनाथ साताप्पा पाटील (वय ३०) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. संशयित किरण हिंदूराव पाटील याने खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी काशिनाथ यांच्या कुटूंबातील जनावरे चुकून किरण यांच्या शेतात गेली होती. त्यावेळी त्यांनी त्यांचे हत्ती गवत खाल्ले होते. याचा जाब विचारण्यासाठी दारात गेलेल्या किरणला मारहाण झाल्याचे समजते. त्यामुळे दोन्ही कुटूंबात वाद निर्माण झाला होता. यावेळी झालेल्या भांडणात मृत काशिनाथ याने किरणची गळपट्टी धरल्याचेही समजते. आज पहाटे कौलव. ता राधानगरी येथील आजोळी आजोबांचे अंत्यसंस्कार करून काशिनाथ नुकताच परत गावी आला होता. त्यानंतर तो शेताकडे फेरी मारण्यासाठी मोटारसायकलवरुन जात असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. आधीच राग मनात ठेवून किरणने मोटारसायकलवरुन पाठी मागून येऊन ऊसतोड करण्यासाठी वापरणाऱ्या कोयत्याने मानेवर सपासप वार करुन काशिनाथचा खून केला.

सकाळी पावणेदहाच्या दरम्यान हा खूऩ झाला असून कुरूकली कॉलेज रोडवरील रिकवेस्ट स्टॉपवर ही घटना घडली आहे. घटनास्थळी करवीर पोलिस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

Shirol Crime News : शिरोळचे मुख्याधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Archana Banage

मोरेवाडी येथे उपसरपंच पदाचा खेळखंडोबा

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्षनिवड : अध्यक्ष निवडीवर होणार शिक्कामोर्तब

Abhijeet Khandekar

Kolhapur; गडहिंग्लज नगरपालिका निवडणूक; खुल्या जागा वाढल्याने चुरस वाढणार

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान

Archana Banage

प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा गजबजू लागल्या शाळा

Archana Banage