Tarun Bharat

कोल्हापूर : कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी २५ उमेदवारांची निवड

कुलगुरू शोध समितीचे नोडल ऑफिसर डॉ. आर. के. जैन यांची माहिती
26 ते 27 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार मुलाखती
शोध समिती मुलाखतीमधून कुलपती कार्यालयाला पाच नावे पाठवणार
कुलपती कार्यालयातील सादरीकरणानंतर पाचपैकी एकाची निवड कुलगुरूपदी होणार

प्रतिनिधी / कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवड प्रक्रियेतंर्गत अर्जांची छाननी करून मुलाखतीसाठी 25 उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. त्यांच्या मुलाखती 26 आणि 27 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहेत. कुलगुरू शोध समिती मुलाखतीमधून पाच जणांची नावे निश्चित करुन कुलपती कार्यालयाला सादर करणार आहे. या पाच उमेदवारांचे कुलपती तथा राज्यपाल यांच्यापुढे त्या पाच जणांचे सादरीकरण होईल. त्यानंतर कुलगुरूपदी एका उमेदवारची निवड केली जाणार आहे, अशी माहिती कुलगुरू शोध समितीचे नोडल ऑफिसर आर. के. जैन यांनी दिली.

तत्कालिन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कुलगुरुपदाचा कार्यकाल 17 जून रोजी संपला आहे. त्यानंतर कुलपती कार्यालयाने कुलगुरू निवड प्रक्रियेतर्गत इच्छुकांकडून 2 जुलैपर्यंत अर्ज मागिवले होते. तर हार्ड कॉपी पाठविण्याची मुदत 10 जुलैपर्यंत होती. कुलपती कार्यालयाने विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरुंनी पहिल्या टप्प्यात त्रिसदस्यीय कुलगुरू शोध समिती नेमली आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव, दिल्ली अशा विविध शहरातील शिक्षण संस्था, नामांकित विद्यापीठातील 169 प्रोफेसरांनी कुलगुरुपदासाठी अर्ज केले आहेत. समितीकडून त्या अर्जांची छाननी करुन पहिल्या टप्प्यातील मुलाखतीसाठी 25 जणांची यादी निश्चित केली आहे.

मुलाखतीस पात्र 25 जणांच्या यादीतील काही नावे..
त्रिसदस्यीय शोध समितीने त्या अर्जांची छाननी करुन निवड प्रक्रियेंतर्गत 25 जणांची नावे मुलाखतीसाठी निश्चित केली आहेत. मुलाखतीस पात्र यादीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव आणि सातारा येथील लालबहाद्दूर शास्त्राr महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ, सांगलीतील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागातील डॉ. व्ही. जे. फुलारी यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच पुणे विद्यापीठातील आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, मानव्यविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे आणि रसायनशास्त्र विभागातील प्रो. डॉ. अविनाश कुंभार यांच्या नावाचा समावेश आहे. इस्लामपूरचे सुपुत्र आणि जळगाव विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर यांचे नावही मुलाखतीच्या 25 जणांच्या यादीत असल्याचे वृत्त आहे.

कुलसचिवासह विद्यापीठातील अनेक जण कुलगुरुपदाच्या शर्यतीतून बाहेर
शिवाजी विद्यापीठातील विविध विभागाचे प्रमुख, प्रोफेसर आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांनी कुलगुरुपदासाठी अर्ज केले होते. यामध्ये कुलसचिव विलास नांदवडेकर, नॅनो टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. पी. एस. पाटील, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले, माजी विभागप्रमुख डॉ. विजय ककडे, डॉ. पी. एस. कांबळे, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. जगन कराडे, कॉमर्स विभागाचे डॉ. अण्णासाहेब गुरव, रसायनशास्त्र विभागातील डॉ. एस. एस. चव्हाण, पर्यावरणशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत, बायोकेमिस्ट्री डॉ. ज्योती जाधव, यांनी कुलगुरुपदासाठी अर्ज केले होते. मात्र कुलगुरू पदासाठी मुलाखतीसाठी जाहीर झालेल्या 25 जणांची यादीत यांचा समावेश नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरचे बरेच उमेदवार कुलगुरूंच्या शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे.

Related Stories

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

Abhijeet Khandekar

कोरोना कामातून ‘या’ कर्मचार्‍यांना मिळाली मुक्ती

Archana Banage

नियम पाळून सोमवारी कोल्हापूर जिल्हातील दुकाने उघडणार

Archana Banage

स्वॅब देण्यासाठी ‘त्या’ युवतीची २८ तास प्रतीक्षा

Archana Banage

…अन् कोल्हापुरात पोलीसांनी घातली पाकिस्तानच्या ध्वजावरून गाडी

Archana Banage

कोल्हापूर : पांगिरेनजीक भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

Archana Banage