Tarun Bharat

कोल्हापूर : केंद्र सरकारवर दबाव वाढवा

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आवाहन
कोल्हापुरात सकल मराठा समाजाची बैठक

प्रतिनिधी / कोल्हापूर

मराठा आरक्षणाला मिळालेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे की नाही? हे तपासून प्रसंगी दबाव वाढवावा लागेल, त्या दृष्टीने सकल मराठा समाजाने नियोजन आणि व्यूहरचना करावी, असे असे आवाहन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले.

कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाच्या वतीने गुरूवारी येथील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाहू महाराज यांनी मार्गदर्शन केले. खासदार संभाजीराजे, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांच्यासह देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, समन्वयक वसंतराव मुळीक, दिलीप देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मराठा आरक्षण, सारथी व इतर मुद्द्यांवर शाहू महाराज यांनी स्पष्ट मत मांडले. ते म्हणाले, आरक्षणाबाबत निर्णय होण्यास विलंब होणार असेल तर आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारचे पाठबळ गरजेचे आहे. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे की, नाही हे देखील तपासून पाहावे लागेल. प्रसंगी केंद्र सरकारवर दबाव वाढवावा लागेल. त्यासाठी मराठा संघटनांबरोबरच राज्यातील लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांनी एकजुटीने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. स्थगिती उठविण्यासाठी न्यायालयीन स्तरावर सुनावणी नियमिपणे होईल, याकडेही लक्ष द्यावे लागेल, अन्यथा तारखांवर सरकार मराठा समाजाला झुलवत ठेवू शकते, असेही शाहू महाराज यांनी सांगितले. सारथी संस्थेच्या स्वायतत्तेविषयी शाहू महाराज म्हणाले, स्वायतत्ता दिली आहे तर मग अंमलबजावणी का होत नाही, यापुढे असे चालणार नाही.

मराठा समाजातील नेत्यांनी राजकीयदृष्ट्या एकत्रित यावे
मराठा समाजातील नेते सर्व राजकीय पक्षात विखुरले आहेत. पण त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपला राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून एकत्रित येणे गरजेचे आहे, असा सल्ला शाहू महाराजांनी यावेळी दिला.

आरक्षणाच्या लढ्यात मी एक सेवक
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांनी बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदारांना एकत्रित आणले. त्यांना बळ दिले. त्यांचा विचार मानणारा  मी आहे. आरक्षणाच्या या लढÎात सेवक म्हणून मी आपल्याबरोबर सदैव आहे, असेही शाहू महाराज यांनी यावेळी सांगितले.

मराठा संघटनांची एकजूट हवी
आरक्षणासाठी विविध मराठा संघटना लढत आहेत. पण त्या स्वतंत्रपणे लढत असल्याने लढा विखुरला गेला आहे. पण यापुढे या सर्व संघटनांनी वेगवेगळे न लढता एकत्रित येऊन, एका झेंडÎाखाली लढावे, तरच आरक्षण लढÎाला आणखीन बळ प्राप्त होईल, असेही शाहू महाराज यांनी सांगितले.

Related Stories

मोटर सायकल चोरी प्रकरणी तरुणास १ वर्ष कारावास

Archana Banage

अहंकार सोडा अन्यथा सांगली जिल्ह्यातील कारखाने आजारी पडतील: राजू शेट्टी

Archana Banage

कोल्हापूर : ग्रामीण भागातील पशुपालकांची पशुखाद्याच्या माध्यमातून लूट

Archana Banage

सभासदांना लाभांश, ठेव वाटप करण्यास परवानगी द्या

Archana Banage

कोल्हापूर : वन्यप्राण्यांच्या हल्यात १० बकरी ठार तर दोन बेपत्ता

Archana Banage

शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अजित नरदे यांचे निधन

Archana Banage